नवी मुंबई : महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कायम कर्मचाºयांना स्थायी समितीने २२ हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. ठोक मानधनावरील कर्मचाºयांना १६ हजार रुपये देण्यात आले असून, सर्वसाधारण सभेच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कर्मचाºयांमध्ये दिवाळीमध्ये किती सानुग्रह अनुदान मिळणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. स्थायी समितीमध्ये प्रशासनाने कायम कर्मचाºयांना १७ हजार रुपये व ठोक मानधन, रोजंदारीवरील आरोग्य सेवक, बालवाडी शिक्षक, मदतनीस यांना ९५०० रुपये प्रस्तावित केले होते. स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनी कायम कर्मचाºयांना २२ हजार व ठोक मानधनावर असलेल्या कर्मचाºयांना १६ हजार रुपये देण्याची घोषणा करून सूचनांसह प्रस्ताव मंजूर केला. यामुळे पालिका कर्मचाºयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महापालिकेने अर्थसंकल्पामध्ये सानुग्रह अनुदानासाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यामधून हा खर्च केला जाणार आहे. स्थायी समितीनंतर हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेमध्ये पाठविण्यात येणार असून सर्वसाधारण सभेमध्ये किती वाढ होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी चांगली जावी यासाठी प्रशासनाने सुचविलेल्या रकमेमध्ये वाढ केली आहे. महापालिकेने नेहमीच कर्मचाºयांच्या हिताचे निर्णय घेतले असून सर्व कामगारांना दिवाळीच्या शुभेच्छा.
- सुरेश कुलकर्णी,सभापती, स्थायी समिती