यादवनगरच्या २२०० विद्यार्थ्यांना न्याय, एमआयडीसीकडून मिळणार ६४५० चौ.मी.चा भूखंड; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 02:52 AM2017-09-22T02:52:53+5:302017-09-22T02:52:59+5:30

यादवनगरमधील पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घेणा-या २२०० विद्यार्थ्यांना अखेर न्याय मिळाला आहे. महापालिकेने एमआयडीसीकडून ६४५० चौरस मीटरचा भूखंड मागितला असून, तेथे भव्य इमारत उभारण्यात येणार आहे.

2200 students of Yadivnagar will get justice, land of 6450 square meter from MIDC; Success of the 'Lokmat' follow-up | यादवनगरच्या २२०० विद्यार्थ्यांना न्याय, एमआयडीसीकडून मिळणार ६४५० चौ.मी.चा भूखंड; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश

यादवनगरच्या २२०० विद्यार्थ्यांना न्याय, एमआयडीसीकडून मिळणार ६४५० चौ.मी.चा भूखंड; ‘लोकमत’च्या पाठपुराव्याला यश

Next

नवी मुंबई : यादवनगरमधील पत्र्याच्या शेडमध्ये शिक्षण घेणा-या २२०० विद्यार्थ्यांना अखेर न्याय मिळाला आहे. महापालिकेने एमआयडीसीकडून ६४५० चौरस मीटरचा भूखंड मागितला असून, तेथे भव्य इमारत उभारण्यात येणार आहे. २७ वर्गखोल्यांसह प्रयोगशाळा, ग्रंथालय, ए.व्ही. रूमची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
नवी मुंबईमधील सर्वाधिक विद्यार्थी असणा-या महत्त्वाच्या शाळांमध्ये यादवनगर शाळा क्रमांक ७७ चा समावेश आहे. २२०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत; परंतु शाळेला स्वतंत्र इमारतच नसल्याने नगरसेविकेचे जनसंपर्क कार्यालय, रामलीला कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या स्टेजभोवती पत्रे लावून शाळा सुरू केली आहे. याशिवाय वाहने उभी करण्यासाठीच्या गॅरेजमध्ये दाटीवाटीने विद्यार्थी बसविले जात आहेत. अपुरा शिक्षकवर्ग, फळा, खडू या अत्यावश्यक वस्तूही पालिकेकडून वेळेत पुरविण्यात येत नाहीत. प्रसाधनगृह, पाणी, वीज या सुविधाही व्यवस्थित नाहीत. जागा नसल्यामुळे यंदा प्रभागाच्या बाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आले होते. महापालिकेने स्कूल व्हीजनच्या माध्यमातून अनेक ठिकाणी बहुमजली इमारती उभ्या केल्या आहेत. अनेक इमारतींचा वापरही केला जात नाही. दुसरीकडे विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या यादवनगरसारख्या झोपडपट्टी परिसरामध्ये नवीन इमारत उभारण्याकडे लक्ष दिले जात नव्हते. माजी नगरसेवक रामअशिष यादव यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. महापालिका प्रशासनाकडेही पाठपुरावा केला होता.
यादवनगरमधील शाळेचा व येथील विद्यार्थ्यांच्या गैरसोयीविषयी ‘लोकमत’नेही वारंवार आवाज उठविला होता. दोन वर्षांपासून सातत्याने या समस्येकडे लक्ष वेधले होते. अखेर महापालिका प्रशासनाने एमआयडीसीकडून ६४५० चौरस मीटरचा भूखंड उपलब्ध करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. एमआयडीसीनेही भूखंड देण्याचे मान्य केले आहे. त्या भूखंडावर २८१३ चौरस मीटर बांधकाम करण्यात येणार आहे. शाळेसाठी २७ वर्गखोल्या, शिक्षकांकरिता स्वतंत्र कक्ष, मुख्याध्यापकांकरिता स्वतंत्र कक्ष, ए.व्ही. रूम, प्रयोगशाळा, ग्रंथालयाची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवी मुंबईमधील भव्य शाळांमध्ये यादवनगरचाही समावेश होणार असून, विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये ११ कोटी ५४ लाख रुपये खर्चास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. प्रत्यक्ष भूखंड ताब्यात आल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू करून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. पालिकेच्या निर्णयामुळे या परिसरातील लोकप्रतिनिधी, पालक यांनी समाधान व्यक्त केले असून शाळेचे काम लवकर सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
>दोन वर्षे पाठपुरावा
यादवनगरमधील शाळेला भूखंड मिळावा, यासाठी यापूर्वीचे नगरसेवक रामअशिष यादव यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. शाळेसाठी तात्पुरती जागाही त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. ‘लोकमत’नेही दोन वर्षांपासून सातत्याने या विषयावर लक्ष वेधले होते.

Web Title: 2200 students of Yadivnagar will get justice, land of 6450 square meter from MIDC; Success of the 'Lokmat' follow-up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.