निवृत्त पोलिस उपायुक्ताच्या पत्नीची २३ लाखांची फसवणूक; बिल्डरविरोधात गुन्हा दाखल, तपास सुरू

By नारायण जाधव | Published: December 27, 2023 07:03 PM2023-12-27T19:03:37+5:302023-12-27T19:03:50+5:30

फसवणूक झालेल्या महिलेने २०१७ मध्ये भूपेशबाबू यांच्या एन.के. कॅस्टल या गृहप्रकल्पाच्या योजनेमध्ये ९ लाख ५३ हजार ८७५ रुपये गुंतविले होते.

23 lakh fraud of wife of retired Deputy Commissioner of Police; A case has been registered against the builder, investigation is on | निवृत्त पोलिस उपायुक्ताच्या पत्नीची २३ लाखांची फसवणूक; बिल्डरविरोधात गुन्हा दाखल, तपास सुरू

निवृत्त पोलिस उपायुक्ताच्या पत्नीची २३ लाखांची फसवणूक; बिल्डरविरोधात गुन्हा दाखल, तपास सुरू

नवी मुंबई : दिल्लीतील स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या एका पोलिस उपायुक्ताच्या पत्नीची एन. के. कॅस्टलचे विकासक निलिपारंबिल कराप्पन भूपेशबाबू याने २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा पनवेल पोलिसांत दाखल झाला आहे.

फसवणूक झालेल्या महिलेने २०१७ मध्ये भूपेशबाबू यांच्या एन.के. कॅस्टल या गृहप्रकल्पाच्या योजनेमध्ये ९ लाख ५३ हजार ८७५ रुपये गुंतविले होते. ही रक्कम एकरकमी अनामत ठेव म्हणून ठेवून त्यावर १६ टक्के व्याज मिळणार असे सांगण्यात आले होते. व्याजासह या रकमेचा परतावा ३१ मार्च २०१८ पर्यंत देऊ असेही सांगितले होते. या व्यवहारात तारण म्हणून एन.के. कॅस्टल या गृहप्रकल्पातील बालसम इमारतीमधील ४०८ चौरस फुटांची सदनिका ज्याची किंमत १८ लाख २५ हजार रुपये आहे, हे निश्चित झाले होते. याबाबतचा सामंजस्य करार दोघांत झाला होता.

परताव्याची रक्कम आणि ठरलेल्या व्याजाची रक्कम न दिल्याने सदर महिलेने वारंवार फोनवरुन संपर्क साधूनही भूपेषबाबू यांनी टाळाटाळ केल्याचे दिलेल्या फौजदारी तक्रारीत महिलेने म्हटले आहे. अखेर संशय बळावल्याने त्यांच्या गृहप्रकल्पाची माहिती घेतल्यावर त्याला शासनाची अधिकृत परवानगी नसल्याचे समजले. तसेच भूपेशबाबू यांच्याकडे भारतीय रिझर्व बँकेकडील गुंतवणूक स्वीकारण्याचा कोणताही परवाना नसल्याचे समजल्यावर सदर महिलेने पोलिसांत तक्रार केली.

Web Title: 23 lakh fraud of wife of retired Deputy Commissioner of Police; A case has been registered against the builder, investigation is on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.