शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

२३ लाखांचा गांजा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 3:10 AM

रबाळे पोलिसांनी घणसोली येथे नाकाबंदीदरम्यान २३ लाखांचा गांजा जप्त केला आहे.

नवी मुंबई : रबाळे पोलिसांनी घणसोली येथे नाकाबंदीदरम्यान २३ लाखांचा गांजा जप्त केला आहे. नाकाबंदीसाठी कार अडवली असता चालकाने कार सोडून पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यामध्ये १५८ किलो गांजा आढळून आला.घणसोली परिसरात मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती रबाळे पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक संजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजमहेंद्र बाळतकर, सहायक निरीक्षक राहुल सोनवणे, नितीन पगार, तुकाराम निंबाळकर यांचे पथक तयार करण्यात आलेले. त्यानुसार सेक्टर ५ व इतर परिसरात सोमवारी पहाटे नाकाबंदी लावण्यात आलेली. त्याठिकाणी रस्त्याने ये-जा करणाऱ्या संशयास्पद वाहनांची चौकशी केली जात होती. याचदरम्यान सदर मार्गाने एक स्कोडा कार (एमएच ४३ ए १८२५) त्याठिकाणी आली. परंतु पोलिसांना पाहताच कारमधील व्यक्तींनी कार जागीच सोडून अंधारात पळ काढला. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न करून देखील ते हाती लागले नाहीत. मात्र नाकाबंदीच्या ठिकाणी ते सोडून गेलेल्या कारची पोलिसांनी झडती घेतली असता, त्यात गांजा आढळून आला. पोलिसांनी कारसह हा गांजा जप्त करून त्याचे वजन केले असता, तो १५८ किलो होता. बाजारभावानुसार त्याची किंमत २३ लाख रुपये असल्याचे सहायक निरीक्षक नितीन पगार यांनी सांगितले. परंतु कार मालक तसेच गांजा घेवून त्याठिकाणी आलेल्या व्यक्तींची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. त्यानुसार रबाळे पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.नवी मुंबईत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला आहे. तर या प्रकारावरून रात्रीच्या वेळी महागड्या गाड्यांमधून त्याची वाहतूक होत असल्याचेही समोर आले आहे. हा गांजा झोपड्यांमध्ये अथवा नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांमार्फत विक्री केला जात असल्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या कारवायांमधून ही बाब समोर आलेली आहे. परंतु सातत्याने कारवाया करून देखील गांजा विक्रीचे अड्डे बंद होत नसल्याने शहरातली तरुणाई नशेच्या आहारी जात चालली आहे. शहरात अनेक ठिकाणी उघड्यावर या गांजाची विक्री होत आहे. तर एपीएमसी, तुर्भेसह अनेक ठिकाणी गांजाची शेती यापूर्वी आढळलेली आहे. परंतु गांजा पुरवणारे मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागत नसल्याने गांजा विक्रीचे अड्डे बंद होत नाहीयेत.