नवी मुंबई - नेरुळ पोलिसांनी एम.डी. पावडर विक्रीसाठी आलेल्या दोघांना सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 23 लाख 1क् हजार रुपये किमतीची 768 ग्रॅम एम.डी. पावडर जप्त करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असून, दोघेही मूळचे उत्तरप्रदेशचे राहणारे आहेत.
नेरुळ परिसरात एम.डी. पावडर घेऊन काही जण येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहायक आयुक्त अमोल ङोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक तयार केले होते. त्यामध्ये पोलीस निरीक्षक मधुकर भटे, सहायक निरीक्षक मनीष कोल्हटकर, राजेश गज्जल, हवालदार चंद्रकांत कदम, सतीश चौधरी, किशोर कोळी, गणोश बनकर, लक्ष्मण कोपरकर, अक्षय पाटील आणि संतोष काकड आदींचा समावेश होता. त्यांनी मंगळवारी नेरुळ व जुईनगर रेल्वेस्थानक परिसरात पाळत ठेवली होती. या वेळी जुईनगर रेल्वेस्थानकाबाहेरील सव्र्हिस रोडवर दोघे जण संशयास्पदरीत्या वावरताना आढळून आले. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन झडती घेतली असता, बॅगमध्ये एम.डी. पावडर हा अमली पदार्थ आढळून आला. या 768 ग्रॅम एम.डी. पावडरची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार 23 लाख 1क् हजार रुपये असल्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांनी सांगितले. ही पावडर घेऊन ते उत्तरप्रदेशमधून रेल्वेने नेरुळमध्ये आले होते, परंतु ठरलेल्या ग्राहकाला ती सोपवून ते निघून जाण्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये नदीम शफीक सलमान (2क्) व त्याच्या 17 वर्षीय साथीदाराचा समावेश आहे. त्यांच्याकडील बॅगमध्ये प्लॅस्टिकच्या पुडीत ही पावडर गुंडाळून ठेवण्यात आली होती. याप्रकरणी त्यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे, तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
पंधरा दिवसांपूर्वी हे दोघे एम.डी. पावडरचा नमुना घेऊन नवी मुंबईत आले होते. या वेळी संबंधितासोबत व्यवहार ठरल्यानंतर ते उत्तरप्रदेशमधून मोठय़ा प्रमाणात एमडी पावडर घेऊन आले होते. मात्र, नेरुळ पोलिसांना खब:यामार्फत त्यांच्या व्यवहाराची माहिती मिळाल्याने त्यांना वेळीच अटक करण्यात आली. यापूर्वी देखील शहरात अमली पदार्थ पुरवणा:यांचे धागेदोरे उत्तरप्रदेशर्पयत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार यापूर्वीच्या गुन्ह्यांमध्ये या दोघांचा समावेश आहे का याचा अधिक तपास नेरुळ पोलीस करत आहेत.