कोलोरेक्टल कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी २४ तास मोफत हेल्पलाइन, नवी मुंबईत मदतीसाठी ‘स्टोमा क्लिनिक’

By नारायण जाधव | Published: December 19, 2022 03:07 PM2022-12-19T15:07:57+5:302022-12-19T15:08:38+5:30

रोबोटिक सेवाचे सल्लागार डॉ. राजेश शिंदे यांनी तयार केलेला सीआरसी समर्थन गट हा महाराष्ट्रातील पहिलाच गट आहे आणि तो सर्व कोलोरेक्टल कर्करोग रुग्णांसाठी मोफत असणार आहे.

24 hours free helpline for colorectal cancer patients, Stoma Clinic for help in Navi Mumbai | कोलोरेक्टल कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी २४ तास मोफत हेल्पलाइन, नवी मुंबईत मदतीसाठी ‘स्टोमा क्लिनिक’

कोलोरेक्टल कर्करोग रुग्णांच्या मदतीसाठी २४ तास मोफत हेल्पलाइन, नवी मुंबईत मदतीसाठी ‘स्टोमा क्लिनिक’

Next

नवी मुबई - नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स हे बहुवैशिष्ट्य वैद्यकीय सेवा प्रदान करण्यात अग्रगण्य रुग्णालय असून त्यांनी कोलोरेक्टल (मोठ्या आतड्यांच्या/बृहदांत्र) कर्करोगाने ग्रस्त असलेल्या आणि स्टोमा क्लिनिकची आवश्यकता असलेल्या रुग्णांना मदत करण्यासाठी समर्पित विनामूल्य समर्थन गट आणि हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. अपोलो हॉप्सिटल्स, नवी मुंबई येथील जीआय (एचपीबी आणि कोलोरेक्टल ऑन्कोलॉजी) आणि रोबोटिक सेवाचे सल्लागार डॉ. राजेश शिंदे यांनी तयार केलेला सीआरसी समर्थन गट हा महाराष्ट्रातील पहिलाच गट आहे आणि तो सर्व कोलोरेक्टल कर्करोग रुग्णांसाठी मोफत असणार आहे.

सीआरसी समर्थन गटाच्या उपक्रमाचा उद्देश कोलोरेक्टल (मोठ्या आतड्यांच्या/बृहदांत्र) कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करणे. हा एक अनोखा उपक्रम असून यामध्ये रुग्ण, त्यांचे कुटुंब आणि काळजीवाहू यांच्यासाठी मोफत प्रवेश असणार आहे. २४ तास समर्पित हेल्पलाइन ही पूर्णपणे अशा प्रशिक्षित परिचारिका, डॉक्टर आणि तज्ञांनी सुसज्ज आहे जे सीआरसी आणि स्टोमासह आयुष्य जगणे आणि पोषण, आरोग्य, मानसिक आरोग्य इ.यांसारख्या इतर प्रश्नांसाठी सहकार्य आणि सल्ला देतील. तसेच हेल्पलाइन आणि व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये देशभरातील रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील प्रवेश मिळेल. स्टोमा क्लिनिक कोलोस्टोमी असलेल्या रुग्णांना वैद्यकीय सेवा प्रदान करेल. कोलोस्टोमीमध्ये मलमूत्राच्या सुरक्षित मार्गासाठी शरीराबाहेरील कोलन (मोठे आतडे) उघडले जाते. स्टोमामधून मल ओटीपोटात जोडलेल्या पिशवीत किंवा थैलीमध्ये वाहून जातो. स्टोमा क्लिनिकमध्ये एक कोलोस्टोमी बॅग व्यवस्थापित करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल आणि रुग्ण व नातेवाईकांना शस्त्रक्रियेपूर्व आणि शस्त्रक्रियेनंतर समुपदेशन प्रदान केले जाईल, जेणेकरून त्यांना मानसिक त्रास होणार नाही.

डॉ.अनिल डिक्रूझ, संचालक-कर्करोग विभाग ऑन्कोलॉजी, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले, "कर्करोगाचे जागतिक प्रमाण २०१२ मध्ये १२ दशलक्ष होते, मात्र २०१८ मध्ये १८ दशलक्ष आणि २०२० मध्ये १९.३ दशलक्ष इतक्या झपाट्याने वाढले आहे. भारतातील कर्करोगाच्या नोंदी पाहता इथेही तीच परिस्थिती आहे. भारतातील ५ अशा सर्वात सामान्य कर्करोगावर प्रतिबंध करता येऊ शकतो आणि यांचे निदानही लवकर होते. आमच्याकडे येणाऱ्या रूग्णांना सर्वोत्तम परिणाम देण्यासाठी उत्कृष्ट पायाभूत सुविधा आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या चिकित्सकांद्वारे समर्थित पुराव्यांवर आधारित स्टोमा क्लिनिक ट्यूमर बोर्ड सारखी अवयव प्रदान करणारी विशेष सेवा सुरू करून अपोलो कर्करोग केंद्र कर्करोगाच्या सेवेला चालना देत आहे."

डॉ. राजेश शिंदे, जीआय (एचपीबी-कोलोरेक्टल ऑन्कोलॉजी)-रोबोटिक सेवा सल्लागार, अपोलो हॉप्सिटल्स, नवी मुंबई म्हणाले,"कोलोरेक्टल (मोठ्या आतड्यांच्या/बृहदांत्र) कर्करोग हा भारतातील सर्वात सामान्य गॅस्ट्रोइंटेस्टाइनल (जठर व आतड्यांसंबंधीचा) कर्करोग आहे. मुंबई महानगरात पहिल्यांदाच आम्ही कोलोरेक्टल (मोठ्या आतड्यांच्या/बृहदांत्र) कर्करोग समर्थन गट आणि एक समर्पित हेल्पलाइन क्रमांक (कोणतीही किंमत नाही) सादर करत आहोत, हा क्रमांक सर्वांसाठी खुला असेल. समर्थन गटाद्वारे कोलोरेक्टल (मोठ्या आतड्यांच्या/बृहदांत्र) कर्करोग असलेल्या इतर रुग्णांशी स्वेच्छेने संपर्क साधता येईल. समर्थन गटाद्वारे रुग्ण त्यांचे अनुभव इतरांना सांगू शकतात, अभिप्राय किंवा सल्ला मिळवू शकतात आणि इतर रुग्णांना रोग किंवा उपचारांबद्दल काही प्रश्न असल्यास त्यांना मार्गदर्शन देखील करू शकतात.

श्री.संतोष मराठे, पश्चिमी विभागाचे प्रादेशिक सीईओ, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई म्हणाले, ‘’युनिटने स्टोमा केअर, नर्सिंग (परिचर्या) आणि पिक लाइन तज्ञांची क्षमता वाढवण्यासाठी देखील गुंतवणूक केली आहे. कोलोरेक्टल (मोठ्या आतड्यांच्या/बृहदांत्र) कर्करोगासाठी संपूर्ण इकोसिस्टम लाँच केल्यामुळे - स्टोमा क्लिनिक, एक समर्पित हेल्पलाइन आणि कोलोरेक्टल (मोठ्या आतड्यांच्या/बृहदांत्र) कर्करोग असलेल्या रुग्णांसाठी मदत गट यामुळे शेवटच्या टप्प्यात असलेल्या रुग्णांची चांगल्या प्रकारे काळजी घेणे शक्य होणार आहे.”

Web Title: 24 hours free helpline for colorectal cancer patients, Stoma Clinic for help in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.