शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

एमपीएससीत २४ पोलिसांना यश

By admin | Published: May 08, 2017 6:24 AM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत नवी मुंबईच्या २४ पोलिसांनी घवघवीत यश मिळवले आहे. पोलीस हवालदार

सूर्यकांत वाघमारे / लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत नवी मुंबईच्या २४ पोलिसांनी घवघवीत यश मिळवले आहे. पोलीस हवालदार, पोलीस नाईक पदावरील या कर्मचऱ्यांनी एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन उपनिरीक्षक बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.एमपीएसी मार्फत नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई यांच्यासाठी ही परीक्षा घेतली जाते. याकरिता त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण व पोलीस दलात ५ ते ६ वर्षांचा कार्यकाळ आवश्यक असतो. त्यानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील १००हून अधिकांनी एमपीएससीच्या परीक्षेत प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. त्यापैकी २४ जणांनी लेखी व मैदानी परीक्षेत चांगले गुण मिळवून एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यांना लवकरच पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती मिळणार असून प्रशिक्षणासाठी पाठवले जाणार आहे. त्यामध्ये स्वप्निल बेलोसे, निवृत्ती शिंदे, नितीन सांगळे, देविदास डमाळे, मनोज महाडिक, संदीप पारखे, समीर बगाडे, मनीष बच्छाव, प्रवीण जगताप, प्रशांत चव्हाण, मनीष साबळे, किशोर नेवसे, नीलेशकुमार जगताप, सचिन देसाई, हर्षद जुईकर, प्रकाश बोडरे, संदीप वांगडे, आबा कटपाळे, नागेश क्षीरसागर, सुनील होळकर, किरण पाटील, सचिन वायकर, मनोज लोहारे व मंगेश बाचकर यांचा समावेश आहे. त्यापैकी सात जण आरबीआयच्या सुरक्षेचे, तिघे वाहतूक शाखेचे, तिघे मुख्यालयाचे आहेत. वरिष्ठांची उदासीनता एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांचा त्या ठिकाणचे आयुक्त अथवा अधीक्षक यांच्यामार्फत सत्कार सुरु आहे.२४ कर्मचारी एमपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही आयुक्त, उपआयुक्त यांच्याकडून अद्याप त्यांची दखल घेण्यात आलेली नाही. याची खंत अत्यंत परिश्रमाने पोलीस उपनिरीक्षक बनलेल्या कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.