शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

दिघा येथे २४६८ कोटींची आयटी टाउनशिप, डाटा सेंटर

By नारायण जाधव | Published: May 13, 2023 7:44 PM

४१ हजार रोजगार : गिगाप्लेक्सच्या पार्कचा विस्तार

नवी मुंबई : रहेजा उद्योग समूह आपल्या नवी मुंबईतील ऐरोली नॉलेज पार्कमधील दिघा येथील गिगाप्लेक्स आयटी टाउनशिप, डाटा सेंटरचा विस्तार करणार असून सध्या याबाबतचा प्रस्ताव परिवेश समितीकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहे. या आयटी पार्क, डाटा सेंटरसाठी २४६८ कोटींची गुंतवणूक प्रस्तावित केली असून येथे ४१ हजार इतकी रोजगार निर्मिती होणार असल्याचे रहेजा समूहाने आपल्या अर्जात म्हटले आहे.

१२० मीटर उंचीच्या २० इमारतीविस्तारित आयटी पार्क २० हेक्टर जागेत बांधण्यात येणार असून येथे १२० मीटर उंचीच्या २० इमारती बांधण्यात येणार आहेत. त्यात सुमारे ६२७ निवासी फ्लॅट असणार आहेत. तर २८२५७९ चौरस मीटर क्षेत्रावर वाणिज्यिक आणि ४८१०१.९ चौरस मीटर क्षेत्रावर डाटासेंटर बांधण्यात येणार आहे. यासर्व इमारतींचे बांधकाम क्षेत्र ८,७८,८९१.९९ चौरस मीटर इतके विस्तीर्ण असणार आहे.

एमआयडीसी देणार पाणी२७५० किलोलिटर पाणी लागणार आहे. त्यापैकी २४५० किलोलिटर सांडपाणी निर्माण होणार आहे. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी कंपनी २९५० किलोलिटर क्षमतेचा एसटीपी प्लाॅन्ट बांधणार आहे. आयटीपार्क आणि डाटा सेंटरसाठी लागणारे पाणी देण्यास एमआयडीसीने आधीच मंजुरी दिली आहे.

दररोज निर्माण होणार १४५१५ किलो कचराप्रस्ताविक आयटी टाउनशिप, डाटा सेंटरमधून दररोज १४५१५ किलो कचरा निर्माण होणार असून त्यात ६५८५ किलो जैविक तर ७९३० किलो अजैविक कचरा असणार आहे.

विस्तीर्ण पार्किंगची सोयप्रस्तावित आयटी टाउनशिप, डाटा सेंटरमध्ये पार्किंगसाठी मोठी सोय केली आहे. यात ६४५ दुचाकींसाठी तर ७१७४ चारचाकींची सोय राहणार आहे.

महावितरण भागविणार विजेची गरजया आयटीपार्क टाउनशिप, डाटासेंटरसाठी एकूण मोठ्याप्रमाणात विजेची गरज भासणार आहे. यात निवासी वापरासाठी ५.१ मेगावॅट तर वाणिज्यिक वापरासाठी १४२.७१ मेगावॅट वीज लागणार आहे.

राष्ट्रीय उद्यान, फ्लेमिंगो अभयारण्याचा अडथळा नाहीया आयटीपार्क टाउनशिप, डाटासेंटर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान सहा किमी तर ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य तीन किमी लांब आहे. यामुळे त्यांचा अडथळा येणार नाही, असे प्रस्तावात म्हटले आहे.

दळणवळणाच्या मुबलक सोयीटीटीसी वसाहतीत रिलायन्स समूहाचा मोठा विस्तार आहे. जिओचा सर्व कारभार येथूनच चालतो. मुबलक पाणी, रस्ते, रेल्वेचे जाळे आहे. मुंबई, ठाणे, पनवेल-उरण आणि कल्याण-डोंबिवली महानगरांना लागूनच ही वसाहत आहे. मुंबई विमानतळासह येथून जेएनपीटी बंदरासह नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून जवळच आहे. ठाणे-बेलापूर, मुंबई-पुणे या दोन शहरांना जोडणारा सायन-पनवेल महामार्ग येथूनच जातो. ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गाचे नियोजित दिघा रेल्वे स्थानक लवकरच सुरू होणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई