वाशीत २५ किलो प्लॅस्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:03 AM2018-10-20T00:03:36+5:302018-10-20T00:03:43+5:30
नवी मुंबई : महानगरपालिकेने वाशीमध्ये धाड टाकून २५ किलो प्लॅस्टिकचा साठा जप्त केला आहे. महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत विसर्जनस्थळांवरही ...
नवी मुंबई : महानगरपालिकेने वाशीमध्ये धाड टाकून २५ किलो प्लॅस्टिकचा साठा जप्त केला आहे. महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत विसर्जनस्थळांवरही स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. याशिवाय शहरात विविध ठिकाणी साफसफाई मोहिमाही राबविल्या जात आहेत. वाशी कार्यक्षेत्रामधील से.१५ कपडा मार्केट व से.९ भाजी मार्केट परिसरात प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करणाºया व्यावसायिकांवर व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाºया व्यावसायिकांकडून २५ किलो प्लॅस्टिकसाठा केला. संबंधितांकडून २८,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. या वेळी वाशी विभागाचे विभाग अधिकारी महेंद्र ठोके, स्वच्छता निरीक्षक सुधीर पोटफोडे, स्वच्छता निरीक्षक कविता खरात, सुषमा देवधर, उपस्वच्छता निरीक्षक व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विसर्जन तलावमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी तलावामध्ये जमा झालेले निर्माल्य काढून ते तलावाजवळ ठेवलेल्या निर्माल्य कलशामध्ये टाकण्यात आले, तसेच या वेळी परिसरातील नागरिकही सहभागी झाले होते.
सदर मोहिमेवेळी उपस्थित नागरिकांना सुका कचरा व ओला कचरा वेगवेगळा करणे व कचरा निर्माण होणाºया ठिकाणीच त्याच्यावर प्रक्रि या करून त्यापासून कंपोस्ट पीट बसविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी विभागातील स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक उपस्वच्छता निरीक्षक, स्वच्छाग्रही, नागरिक उपस्थित होते.