वर्षभरात रस्ते अपघातात २५० जणांचा मृत्यू; ४९५ प्रवासी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:30 AM2019-01-02T00:30:43+5:302019-01-02T00:30:51+5:30

पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वर्षभरात घडलेल्या २३९ प्राणांतिक अपघातांमध्ये २५० जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. गेले वर्षभर पोलिसांनी राबवलेल्या जनजागृती अभियानांमुळे २०१७ च्या तुलनेत गतवर्षी अपघातांमध्ये १५४ ची घट झाली आहे.

 250 people killed in road accidents during the year; 495 passengers seriously injured | वर्षभरात रस्ते अपघातात २५० जणांचा मृत्यू; ४९५ प्रवासी गंभीर जखमी

वर्षभरात रस्ते अपघातात २५० जणांचा मृत्यू; ४९५ प्रवासी गंभीर जखमी

Next

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वर्षभरात घडलेल्या २३९ प्राणांतिक अपघातांमध्ये २५० जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. गेले वर्षभर पोलिसांनी राबवलेल्या जनजागृती अभियानांमुळे २०१७ च्या तुलनेत गतवर्षी अपघातांमध्ये १५४ ची घट झाली आहे. मात्र, काही मोठ्या अपघातांमुळे मृत्यूच्या संख्येत १९ ने वाढ झाली आहे.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था, अतिवेगात वाहन चालवणे, अशा प्रकारांमुळे २०१७ मध्ये एकूण १२७२ अपघात घडले होते, त्यामध्ये सायन-पनवेल मार्गावरील नव्या उड्डाणपुलाच्या डांबरीकरणातील त्रुटीमुळे घडलेल्या अपघातासह पनवेल, उरण मार्गाच्या दुरवस्थेमुळे घडलेल्या गंभीर अपघातांचा समावेश होता. त्या ठिकाणी घडलेले बहुतांश अपघात पावसाळा दरम्यानचे आहेत. मात्र, २०१८ मध्ये रस्ते अपघातांचे प्रमाण घटावे, यासाठी पोलिसांनी वर्षभर विविध उपक्रमांद्वारे प्रयत्न केले, त्यामध्ये संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करून खड्डे पडलेल्या रस्त्यांची डागडुजी करून घेण्यासह वाहनचालकांमध्ये जनजागृती अभियानांचाही समावेश होता. तसेच वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाईच्याही मोहिमा राबवण्यात आल्या. परिणामी, चालकांमध्ये बºया प्रमाणात जनजागृती झाल्याने तसेच रस्त्यांच्या परिस्थितीत सुधार घडू लागल्याने २०१७ च्या तुलनेत गतवर्षी अपघातांच्या संख्येत १५४ ने घट झाली आहे. २०१७ मध्ये घडलेल्या एकूण १२७२ अपघातांपैकी २२३ प्राणांतिक अपघातांमध्ये २३१ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, गतवर्षी एकूण १११८ अपघात घडले असून, त्यापैकी २३९ प्राणांतिक अपघातात २५० जणांना मृत्यूने कवटाळले आहे. त्यापैकी काही अपघात सायन-पनवेल मार्गावरील तसेच उरण मार्गावरील खड्ड्यांमुळे घडलेले आहेत. वर्षाखेरीस रस्ते सुरक्षा समितीने सातत्याने अपघात घडणाºया ठिकाणांना ब्लॅक स्पॉट घोषित करून त्या ठिकाणी आवश्यक दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या होत्या. त्यामध्ये वाशी खाडीपुलाचाही समावेश होता. वर्षाखेरीस अपघातसदृश ठिकाणांवर दुरुस्तीकामे झाल्यानेही अपघातांना काही प्रमाणात आळा बसलेला आहे.
बहुतांश अपघातांना रस्त्याच्या दुरवस्थेसह वाहन चालकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असतो. या दोन्ही बाबींमध्ये सुधार घडवण्याच्या उद्देशाने विद्यमान आयुक्त संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांसह दोन्ही परिमंडळाच्या पोलिसांकडून विविध उपक्रम राबवण्यात आले, त्यामुळे किरकोळ अपघातांनाही आळा बसला असून, २०१७ च्या तुलनेत गतवर्षी किरकोळ अपघातांच्या घटना १८३ ने कमी झाल्या आहेत. सायन -पनवेल मार्गावरील पुलांच्या ठिकाणी मार्गदर्शक फलक नसल्यानेही अपघात घडले आहेत. त्यामध्ये सानपाडा, घणसोली, शिरवणे, सीबीडी आदी ठिकाणच्या पुलांचा समावेश आहे.

वाशीत टेम्पोचा अपघात
वाशीत टेम्पो दुभाजकाला धडकल्याची घटना सोमवारी रात्री वाशी सेक्टर १७ तेथे घडली. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला असून, त्याने मद्यपान केल्याचे पोलिसांना आढळून आले. सुदैवाने या वेळी रस्त्यावर तुरळक वाहतूक होती. अन्यथा, टेम्पोचालकाच्या हलगर्जीमुळे इतरांना मृत्यूच्या दाढेखाली जावे लागले असते. याचदरम्यान, पामबीच मार्गावर नेरुळ येथे रिक्षाने बॅरिकेड्सला धडक दिल्याने अपघात झाला. सदर ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करून बॅरिकेड्स लावल्याचे रिक्षाचालकाच्या निदर्शनास आले नाही, यामुळे त्याने बॅरिकेड्सला धडक दिल्याने हा अपघात झाला असून, त्यामध्ये प्रवाशासह रिक्षाचालक किरकोळ जखमी झाला आहे.

रेल्वे अपघातात २५१ बळी
शहरातील ट्रान्स हार्बर तसेच हार्बर मार्गावर रेल्वेच्या धडकेने तसेच रेल्वेतून पडून वर्षभरात २५१ जणांचा बळी गेला आहे. रेल्वेतून प्रवास करताना अनेकदा प्रवाशांकडून दरवाजात उभे राहण्याला पसंती दिली जाते. गर्दीच्या वेळी त्यांची ही हौस जीवावर बेतल्याचे अनेक अपघातांमधून समोर आलेले आहे, तर रेल्वे रुळ ओलांडणे धोकादायक असतानाही अनेक ठिकाणी प्रवासी रुळावरून चालत स्थानकात जाताना दिसतात. परिणामी, अशांना रेल्वेच्या धडकेने मृत्यूच्या दाढेत जावे लागत आहे. त्यानुसार गतवर्षी रेल्वे रुळावर झालेल्या मृतांमध्ये १७९ अपघात वाशी रेल्वे पोलिसांच्या हद्दीतील आहेत. त्यामध्ये हार्बर मार्गावरील सीवूड ते गोवंडीपर्यंतच्या स्थानकांचा व ट्रान्स हार्बर मार्गावरील वाशी ते रबाळेपर्यंतच्या स्थानकांचा समावेश आहे. तर ७२ अपघात पनवेल रेल्वेपोलिसांच्या हद्दीतील असून, त्यामध्ये बेलापूर ते पनवेल व कळंबोलीपर्यंतच्या रेल्वेमार्गाचा समावेश आहे. नागरिकांकडून रेल्वे रुळ ओलांडला जाऊ नये, याकरिता अनेक ठिकाणी रुळावर पादचारी पूल उभारण्याचेही काम सुरू आहे; परंतु रेल्वे प्रवाशांकडून शॉर्टकटला अधिक पसंती मिळत असल्याने हाच शॉर्टकट त्यांच्या जीवावर बेतत आहे.

Web Title:  250 people killed in road accidents during the year; 495 passengers seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात