रोह्यात चार तासांत २६.१६ टक्के

By admin | Published: February 22, 2017 06:52 AM2017-02-22T06:52:55+5:302017-02-22T06:52:55+5:30

रायगड जिल्हा परिषदेच्या चार व तालुका पंचायत समितीच्या आठ जागांसाठी मंगळवारी सकाळी

26.16 percent in four hours | रोह्यात चार तासांत २६.१६ टक्के

रोह्यात चार तासांत २६.१६ टक्के

Next

रोहा : रायगड जिल्हा परिषदेच्या चार व तालुका पंचायत समितीच्या आठ जागांसाठी मंगळवारी सकाळी ११.३०पर्यंत चार तासांत २६.१६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. नागोठणे गटात सर्वाधिक २९.८९ टक्के तर खारगाव गटात सर्वात कमी २४.९१ टक्के मतदान झाले होते.
मंगळवारी सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या होत्या. रोहा शहरालगतच्या गावांपेक्षा विशेषत: ग्रामीण भागातील मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह अधिक होता. यात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. मतदार यादीत नाव नसल्याने मतदानाचा हक्क न मिळाल्याच्या तुरळक घटना वगळता मतदान प्रक्रि या पूर्णपणे शांततेत चालू होती. सकाळी साडेअकरापर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार जिल्हा परिषद गटांमध्ये नागोठणे २९.८९, आंबेवाडी २५.४६, वरसे २४.९६ तर खारगाव २४.९१ टक्के मतदान झाले होते. तर पंचायत समिती गणांमध्ये नागोठणेत २९.७६, ऐनघर ३०.०२, खांब सर्वात कमी २१.३२, आंबेवाडी सर्वाधिक ३०.६८, धाटाव २५.९८, वरसे २३.९०, खारगाव २४.१९ तर विरझोली २५.६२ टक्के इतके मतदान झाले होते. (वार्ताहर)

धाटावमध्ये सरासरी ७४ टक्के मतदान
च्धाटाव : रोह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण चार जागांकरिता १२ तर पंचायत समितीच्या ८ जागांसाठी २४ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. रोहा तालुक्यात गटनिहाय मतदारांची संख्या २१ जानेवारी रोजीच्या अंतिम मतदार यादीप्रमाणे १ लाख १५ हजार ८१२ मतदार आहेत. यामध्ये एकूण पुरु ष मतदार ६० हजार ८० असून महिला मतदार ५५ हजार ७३२ एवढी असल्याने कोण किती मताधिक्य घेणार हे मतमोजणीदरम्यान स्पष्ट होणार आहे. मंगळवारी सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे दिसून आले. धाटावमध्ये सरासरी ७४ टक्के मतदान झाले. रोह्यात निवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आल्याने प्रांताधिकारी रवींद्र बोंबले,तहसीलदार सुरेश काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील एकूणच १५९ मतदान केंद्रावरील अधिकारी वर्गाची नेमणूक व साहित्य वाटप करण्यात आले होते. पोलीस कर्मचारीवर्गाकडून सुद्धा बंदोबस्त चोखपणे ठेवण्यात आला होता. धाटावमध्ये सरासरी ७४ टक्के मतदान झाले.यापैकी एकूण चार मतदान केंद्रावरील मतदानापैकी मतदान केंद्र १ वर ११९१ पैकी ९३६, मतदान केंद्र २ वर ८०० पैकी ६३२, मतदान केंद ३ वर ३५४ पैकी २५१ तर, मतदान केंद्र ४ वर ७३१ पैकी ४३० मतदान झाले.

Web Title: 26.16 percent in four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.