शहरातील २६२ व्यावसायिकांवर कारवाई
By admin | Published: May 11, 2017 02:17 AM2017-05-11T02:17:19+5:302017-05-11T02:17:19+5:30
महापालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानदारांविरोधात तीव्र कारवई करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिकेने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर करणाऱ्या दुकानदारांविरोधात तीव्र कारवई करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत २६२ व्यावसायिकांवर कारवाई करून १३ लाख ७० हजार रूपये दंड वसूल केला आहे.
नवी मुंबई प्लास्टीकमुक्त बनविण्यासाठी पालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. आयुक्त रामास्वामी एन. यांनीही नियम तोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. प्रशासनाने ८ जानेवारीला राबविलेल्या विशेष अभियानामधून २२ टन प्लास्टीक संकलित केले होते. याशिवाय वर्षभरामध्ये तब्बल २६२ व्यापाऱ्यांविरोधात कारवाई केली आहे.
ज्या दुकानामध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आढळतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. ही कारवाई यापुढे अजून तीव्र केली जाणार आहे. आयुक्तांनी स्वत: प्लास्टीकचा वापर थांबविला आहे. कुठेही खरेदीसाठी गेल्यानंतर शक्यतो प्लास्टीक पिशवीतून वस्तू घेत नाही. नागरिकांनीही प्लास्टीकचा वापर करू नये असे आवाहन केले आहे.