शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
2
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
3
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
4
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
5
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर; कुणाकुणाला संधी? पाहा...
6
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
7
"लाव रे तो व्हिडिओ..."  विषय 'गंभीर', दोन दिवस खेळायला कुणीच नाही 'खंबीर'
8
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
9
एकेकाळी राणेंना आव्हान देणारा शिवसैनिक ठाकरे गटात, परशुराम उपरकर यांनी हाती बांधलं शिवबंधन 
10
भाजपाच्या यादीत किती महिलांना स्थान?; खासदार अशोक चव्हाणांच्या मुलीला मिळाली संधी
11
Somy Ali : "बिश्नोई समाज काळवीटाची पूजा करतो हे सलमानला माहीत नव्हतं, मी त्यांची माफी मागणार"
12
उमेदवार द्यायचे की पाडायचे? मनोज जरांगे पाटील यांनी घेतला मोठा निर्णय, केली महत्त्वाची घोषणा
13
गणपत गायकवाड यांच्या पत्नीला भाजपकडून तिकीट; शिवसेनेचे महेश गायकवाड अपक्ष लढणार?
14
पहिली यादी आली, भाजपाला मोठा धक्का; माजी आमदाराचा पक्षाला रामराम, परिवर्तन महाशक्तीत प्रवेश
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी CM एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहाटीला जाणार? शिवसेनेचे नेते म्हणाले...
16
अलर्ट! UPI फ्रॉडपासून सावधान; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
17
उद्धव ठाकरेंच्या रणनीतीला शरद पवारांचा ब्रेक?; सांगोला मतदारसंघावरून होणार वाद
18
"पराभवाच्या भीतीमुळेच विरोधकांची मतदार यादीवरून ओरड", भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा टोला 
19
मोठा ट्विस्ट! विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हात बदल? आयोगाने घेतला निर्णय
20
महागाईचा चटका! आता CNG सामान्यांचा खिसा खाली करणार, कितीने वाढणार?

मीरारोडसह कल्याण-तळोजा मेट्रोसाठी २६८.५३ कोटींचा सल्लागार, MMRDA ची मान्यता

By नारायण जाधव | Published: September 05, 2022 4:17 PM

एमएमआरडीएची २७१ व्या बैठकीत मान्यता, पाच महानगरांचा होणार फायदा

नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-भिवंडी आणि नवी मुंबई या पाच महानगरांना जोडणाऱ्या एकूण दोन मेट्रो मार्गांच्या स्थापत्य व प्रणाली कामांसाठी अखेर एमएमआरडीएसला सल्लागार मिळाले आहेत. यातील मेट्रो मार्ग क्रमांक १० गायमुख ते शिवाजी चौक, मीरारोड आणि मेट्रो मार्ग क्रमांक १२ कल्याण ते तळोजासाठी मेसर्स सिस्ट्रा एस.ए आणि मेसर्स डी.बी. इंजिनिअरिंग आणि कन्सल्टिंग जीएमबी यांची संयुक्त निविदेला एमएमआरडीएने आपल्या २७१ व्या बैठकीत मान्यता दिली आहे. सल्लागारांवरील ही रक्कम २६८ कोटी ५३ लाख ३५ हजार ८६० रुपये आहे.

मेट्रो मार्ग क्रमांक १० ची एकूण किमत ४४७६ कोटी तर मेट्रो मार्ग क्रमांक १२ ची एकूण किमत ५८६५ कोटी रुपये आहे. या दोन्ही मार्गांच्या पूर्णत्त्वाची एकूण किमत १० हजार ३४१ कोटी रुपये आहे. यामुळे सल्लागारांचे एकूण शुल्क या रकमच्या २.६० टक्के आहे.

मेट्रो मार्ग क्रमांक १०मेट्रो-७ चा विस्तार करण्यासाठी एमएमआरडीएतर्फे मेट्रो-१० चा प्रकल्प मांडण्यात आला आहे. मेट्रो-१०ने हा गायमुख ते शिवाजी चौक ९.२०९ किमीचा आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ४४७६ कोटी इतका असून, त्यावर गायमुख, गायमुख रेती बंदर, वर्सोवा चारफाटा, काशीमीरा, शिवाजी चौक ही स्थानके आहेत. याप्रकल्पामुळे मुंबई, बोरीवली, मीरा-भाईंदर, घोडबंदर रोड व ठाणे येथील नागरिकांना फायदा होणार आहे.

मेट्रो मार्ग क्रमांक १२मेट्रो-१२ हा मेट्रो-५चा विस्तार असणार असून संपूर्ण मार्ग २०.७५६ किलोमीटरचा आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ४४७६ कोटी इतका असून या मार्गात १७ स्टेशन्स असणार आहेत. यात एपीएमसी कल्याण, गणेशनगर, पिसावलीगाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजेगाव, वडवली, बाले, वाकळण, तुर्भे, पिसावे डेपो, पिसावे, तळोजा यांचा समावेश आहे. या प्रकल्पाचा कल्याण-डोंबिवली, शीळफाटासह नवी मुंबईतील रहिवाशांना फायदा होणार आहे.

जमीन संपादनासह खारफुटींचा मोठा अडथळास्थापत्य व प्रणाली कामांसाठी आता सल्लागार नेमण्यास मंजुरी मिळाली असली तरी या सर्व मार्गांत पर्यावरण विषयक मंजुऱ्यांचा मोठा अडथळा राहणार आहे. कारण खासगी जमिनींच्या संपादनासह खाडीपात्र बुजवून खारफुटींची कत्तल त्यासाठी करावी लागणार असून, यासाठी पर्यावरण मंत्रालयांचे उंबरठे झिजवावे लागणार आहेत. या मंजुऱ्या कधी मिळतात, त्यावरच हे सर्व प्रकल्प किती गती पकडतात, हे अवलंबून आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईmmrdaएमएमआरडीएMetroमेट्रो