पाणीबिलापोटी २७ कोटींची थकबाकी, उरणमधील १४ ग्रामपंचायतीचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 12:12 AM2020-02-01T00:12:53+5:302020-02-01T00:13:19+5:30

तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र आणि ३५ ग्रामपंचायतींना एमआयडीसीमार्फत रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पाणीपुरवठ्याची बिले भरण्याची तत्परता मोजक्या ग्रामपंचायतींकडून दाखवली जाते.

27 crores outstanding for water bills, 14 gram panchayats in Uran | पाणीबिलापोटी २७ कोटींची थकबाकी, उरणमधील १४ ग्रामपंचायतीचा समावेश

पाणीबिलापोटी २७ कोटींची थकबाकी, उरणमधील १४ ग्रामपंचायतीचा समावेश

googlenewsNext

- मधुकर ठाकूर

उरण : उरण तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींकडे एमआयडीसीची डिसेंबर २०१९ अखेर पाणीबिलाची २७ कोटी ११ लाख १६ हजार ०६७ रुपये इतकी थकबाकी आहे. यामध्ये आर्थिकदृष्ट्या सधन समजल्या जाणाऱ्या जेएनपीटी आणि ओएनजीसी हद्दीतील १२ ग्रामपंचायती आघाडीवर आहेत. ग्रामपंचायतींकडे असलेल्या कोट्यवधींच्या थकबाकीमुळे मात्र एमआयडीसीच्या विकासकामांना खीळ बसली असल्याची माहिती उरण उपअभियंता रणजित बिरंजे यांनी दिली.
तालुक्यातील औद्योगिक क्षेत्र आणि ३५ ग्रामपंचायतींना एमआयडीसीमार्फत रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, पाणीपुरवठ्याची बिले भरण्याची तत्परता मोजक्या ग्रामपंचायतींकडून दाखवली जाते.
ग्रामपंचायतींकडील पाणीबिलांच्या थकबाकीचा आकडा प्रत्येक महिन्याकाठी आणि दरवर्षी वाढतच आहे.
डिसेंबर २०१९ महिन्याअखेरपर्यंत तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींकडे एमआयडीसीची २७ कोटी ११ लाख १६ हजार ६७ रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीदारांमध्ये नवीन शेवा- दोन कोटी ४० लाख ५३ हजार ५००, हनुमान कोळीवाडा- ३० लाख १६ हजार २१६, करळ - ६४ लाख २५ हजार २६२, धुतुम - ९१ लाख ३३ हजार २२२, जसखार - एक कोटी १६ लाख ७२ हजार ६३९, बोकडवीरा - एक कोटी ६३ लाख ६३ हजार २८०, फुंडे-दोन कोटी ३७ लाख ६७ हजार ८१२, सावरखार- ३३ लाख ९७ हजार १२८, डोंगरी - ४१ लाख ४८ हजार ६९८, सोनारी- ७८ लाख १२ हजार ५३, नागाव - एक कोटी एक लाख ६८ हजार २८८, चाणजे-पाच कोटी ४९ लाख ९२ हजार ३१२, चिर्ले-एक कोटी ६५ लाख नऊ हजार ७१४, केगाव - एक कोटी ५६ लाख ५६ हजार ८३, म्हातवली - ७२ लाख ५० हजार १८६, तेलीपाडा - दोन लाख ३२ हजार २८२ आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
तर चिरनेर कनेक्शन - दोन कोटी ७२ लाख राच हजार ४९, खोपटा कनेक्शन- सहा लाख ४७ हजार ४४४, दिघोडे - एक कोटी २७ लाख ७२ हजार २७२, दादरपाडा- १७ लाख ६३ हजार ९१२, वेश्वी-एक कोटी नऊ लाख ९१ हजार ९०४, रांजणपाडा- चार लाख ४६ हजार १११, नवघर-२० लाख ६६ हजार ७७, पागोटे- सहा लाख २४ हजार ६२३ आदी थकबाकीदार आठ ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठा एमआयडीसीकडून याआधीच बंद करण्यात आला आहे. मात्र, ग्रामपंचायतींकडे थकबाकी कायम आहे.

थकबाकीदारांना नोटीस
थकबाकीदारांमध्ये जेएनपीटी हद्दीतील नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा, फुंडे, डोंगरी, जसखार, सोनारी, करळ, सावरखार, बोकडवीरा या नऊ तर ओएनजीसी हद्दीतील नागाव, म्हातवली, चाणजे या तीन अशा एकूण आर्थिकदृष्ट्या सधन म्हणून ओळखल्या जाणाºया १२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. वसुलीसाठी थकबाकीदार असलेल्या ग्रामपंचायतींना सातत्याने नोटिसाही बजावण्यात येत आहेत. मात्र, त्यानंतरही ग्रामपंचायतींकडून थकबाकीची रक्कम जमा करण्यात टाळाटाळ केली जात आहे.

Web Title: 27 crores outstanding for water bills, 14 gram panchayats in Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी