आविष्कार देसाई अलिबाग : जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांनी रायगड जिल्ह्यातील ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रातील एक हजार ३१८ पाणी नमुन्यांची तपासणी केली. या तपासणीत २७१ पाणी उद्भव दूषित असल्याचे समोर आले आहे. मोठ्या संख्येने दूषित पाणी पिण्याचे प्रमाण या आकडेवारी वरून स्पष्ट होत असल्याने ग्रामीण भागामध्ये साथीचे रोग पसरण्यासारखी महाभयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.ग्रामिण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठ्याच्या योजना आखल्या जातात. त्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकार कोट्यवधी रुपयांच्या निधीची आर्थिक गंगा रायगड जिल्हा परिषदेच्या तिजोरीमध्ये पडत असते. शहरांच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागांमध्ये नागरिक मोठ्या संख्येने राहतात. तेथील नागरिकांना मूलभूत गरजेपैकी महत्त्वाची पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी जिल्हा परिषद प्रशासनाच्या पाणीपुरवठा विभागाची आहे. तसेच त्यांना देण्यात येणारे पाणी शुध्द आहे की अशुध्द याची पाहणी करण्याचे काम हे आरोग्य विभागाचे आहे. पाणी दूषित असेल, तर विविध उपाय योजना आरोग्य विभागामार्फत पुरविल्या जातात. पाणी पुरवठा करताना पाण्याची टाकी, पाइपलाइन तसेच फिल्टरेशन प्लॅण्ट बसविण्याची जबाबदारी ही पाणी पुरवठा विभागाची आहे. ज्या ठिकाणी अशी व्यवस्था नसेल त्या ठिकाणच्या पाणी उद्भवाभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवणे, तेथील पाण्यामध्ये टीलीएल पावडर टाकणे, नागरिकांना पाणी उकळून व गाळून पिण्यासाठी प्रवृत्त करणे ही कामे आरोग्य विभागाने करणे अपेक्षित आहे.जिल्ह्यातील एक हजार ३१८ पाणी नमुन्यांची तपासणी केली. या तपासणीत २७१ पाणी उद्भव दूषित असल्याचे समोर आले आहे. तेच पाणी हजारो नागरिक पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन त्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. सध्या पावसाचा जोर कायम आहे. त्यातच पाण्याचे नमुने दूषित असल्याने साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकरता येणार नाही. याचाच अर्थ आरोग्य, पाणी पुरवठा या यंत्रणा कुचकामी ठरल्याचे अधोरेखित होते.ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवाशी सुरु असलेला खेळ रायगड जिल्हा परिषदेने तातडीने थांबवावा, अशी मागणी शहापूरचे ग्रामस्थ तथा श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा संघटक राजन भगत यांनी के ली आहे. पावसाळ्याच्या व्यतिरिक्तही गावामध्ये दूषित पाणी येते. त्यामुळे नागगिराकांना ते पाणी पिण्यावाचून पर्याय नसतो. ज्यांच्याकडे पैसे आहेत, ते पाणी विकत आणून पितात, ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांची फारच अडचण होते, असेही त्यांनी स्पष्टकेले. रामराज परिसरातील नागरिकांनाही दूषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. या ठिकाणी फिल्टरेशन प्लॅण्ट नसल्याने नागरिकांवर ही वेळ आली असल्याचे भिलजीचे ग्रामस्थ मनीष पुनकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.अलिबाग तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत असणाºया २४६ पाणी नमुन्यांचे जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने तपासणी केली. त्यामध्ये ४९ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. यामधील पेढांबे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावातील पाच, रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावातील ११, धोकवडे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावातील १०, चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावातील चार आणि पोयनाड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावातील १९ पाणी नमुने दूषित आढळले आहेत.1पेण तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रातील २४ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी वाशी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत गावातील १५ नमुन्यांपैकी सहा, गडब प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत गावातील नऊ नमुन्यांपैकी एक पाणी उद्भव असे एकूण सात पाणी उद्भव दूषित आढळले आहेत.2पनवेल तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रातील २८ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १७ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. त्यामध्ये नेरे येथील १० आणि गव्हाण प्राथमिक आरोग्य केंद्रातील सात पाणी नमुने दूषित आढळले आहेत.3रोहा तालु्क्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये १६४ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १६ पाणी नमुने दूषित आढळले आहेत.4पोलादपूर तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रातील ४३ पाणी नमुने तपासण्यात आले त्यापैकी पितळवाडी येथील दोन पाणी नमुने दूषित आढळले आहेत.5महाड तालु्क्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २० पाणी नमुने दूषित आढळले आहेत. त्यामधील बिरवाडी ५, विन्हेरे ३, पाचाड १, चिंभावे १, दासगाव ६ आणि वरंध प्राथमिक आरोग्य केंद्रातील ४ पाणी नमुने दूषित असल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहेत.6माणगाव तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य के ंद्रामधील १७२ पाणी नमुने तपासण्यात आले. तेथील एकूण ४७ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. तळा प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गातील तपासण्यात आलेल्या १७ पाणी नमुन्यांतील एकच पाणी उद्भव दूषित आढळला आहे.7कर्जत तालु्क्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रामधील १३१ पाणी नमुन्यांची तपासणी करण्यात आली .२७ पाणी नमुने दूषित आढळले.
जिल्ह्यातील २७१ पाण्याचे उद्भव दूषित, आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 2:33 AM