महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी २८ हजार अर्ज, आचारसंहितेमुळे प्रक्रियेला विलंब

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 02:53 AM2019-05-10T02:53:22+5:302019-05-10T02:53:35+5:30

नवी मुंबई शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पाल्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचण येऊ नये यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते.

28 thousand applications for municipal scholarship scheme, delays in processing due to code of conduct | महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी २८ हजार अर्ज, आचारसंहितेमुळे प्रक्रियेला विलंब

महापालिकेच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी २८ हजार अर्ज, आचारसंहितेमुळे प्रक्रियेला विलंब

googlenewsNext

- योगेश पिंगळे
नवी मुंबई - शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पाल्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचण येऊ नये यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. यंदा योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरातून सुमारे २८ हजार अर्ज महापालिकेला प्राप्त झाले असून, त्या अनुषंगाने सुमारे १८ कोटी रुपयांचे वाटप करावे लागणार आहे. आचारसंहितेमुळे शिष्यवृत्ती योजनेचे पैसे वाटप प्रक्रि येला विलंब झाला आहे.

नवी मुंबई शहरात विविध घटकातील नागरिक वास्तव्य करतात. या नागरिकांच्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी महापालिकेने विविध माध्यमांच्या शाळा सुरू केल्या आहेत. या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या माध्यमातून शालेय साहित्य, गणवेश, भोजन यासारख्या सुविधा देखील पुरविल्या जातात. शहरातील प्रकल्पग्रस्त नागरिकांची मुले, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुले, मागासवर्गीय घटकातील मुले, विधवा, घटस्फोटित महिलांची मुले, दगडखाण बांधकाम करणाºया कामगारांची मुले या सर्व घटकातील पहिली ते पदवी आणि त्यानंतर तांत्रिक / व्यवसाय प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे त्यांचा विकास आणि कुटुंबाची उन्नती खुंटते. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शैक्षणिक प्रगती आणि गुणवत्ता वाढीस मदत व्हावी या अनुषंगाने महापालिकेतर्फे शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे.

महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या या योजनेची मोठ्या प्रमाणावर जनजागृती झाल्याने मागील वर्षापेक्षा यंदा दुप्पट अर्ज महापालिकेकडे दाखल झाले आहेत. गेल्यावर्षी १४हजार ५00 अर्ज दाखल झाले होते, त्या वेळी ९ कोटी ८७ लाख रु पयांचे वाटप करण्यात आले होते. यंदा२८ हजार अर्ज दाखल झाले असून १७ कोटी ९0 लाख रु पयांचे वाटप करावे लागणार आहे. दोन महिन्यांपूर्वी याबाबतचा प्रस्ताव महासभेत अंतिम मंजुरीसाठी आला होता. परंतु सदरच्या प्रस्तावावर महिला बालकल्याण समिती सभेत चर्चा व्हावी आणि त्या समितीच्या माध्यमातून महासभेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने शिष्यवृत्ती वाटपाला विलंब झाला आहे.

वर्षनिहाय प्राप्त अर्ज
2015-16 7000
2016-17 - 7000
2017-18 14500
2018-19 28000

विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती रक्कम

पहिली ते चौथी 4000
पाचवी ते सातवी 6000
आठवी ते दहावी 8000
अकरावी आणि बारावी 9600
महाविद्यालयीन ते पदवी 12000
पदवीनंतरचे शिक्षण 16000
तंत्र प्रशिक्षण 8000
 

Web Title: 28 thousand applications for municipal scholarship scheme, delays in processing due to code of conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.