नवी मुंबई : लॉकडाउनच्या सर्व नियमांचे पालन करून कोकण विभागात मनरेगा योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण ५ हजार ९७५ कामे सुरू झाली आहेत. त्यात २८ हजार मजूर प्रत्यक्षरीत्या काम करीत आहेत, अशी माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे.कोकण विभागात ३ हजार १९ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ठाणे-१६, पालघर २४४, रायगड ८७, रत्नागिरी २७५, सिंधुदुर्ग २८८ अशा एकूण १ हजार ३0 ग्रामपंचायतींमध्ये कामे सुरू आहेत. कृषी, वनपरिक्षेत्र, वनप्रकल्प, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम, रेशीम विकास अशा विविध विभागांमार्फत सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात ३८८ कामे सुरू असून त्यात १ हजार २९८ मजूर काम करीत आहेत. त्याचप्रमाणे रायगड २0३ कामे - ६८३ मजूर, पालघर २ हजार ४२५ कामे - १७ हजार ६४८ मजूर, रत्नागिरी १ हजार ७१४ कामे - ४ हजार ९६0 मजूर, सिंधुदुर्ग १ हजार २0 कामे - ३ हजार ४२७ मजूर संख्या आहे.>विभागीय महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळात आहे. त्यानुसार मनरेगा योजनेंतर्गत कामांच्या संख्येत ३२९ इतकी वाढ झाली असून मजुरांच्या उपस्थितीत ३ हजार ११ इतकी वाढ झाली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अटी-शर्तींच्या अधीन राहून कामे केली जात असल्याचे विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले.
कोकण विभागातील २८ हजार मजूर कामांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 2:05 AM