शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

मराठी माणसांना 300, तर परप्रांतीयांना 400 रुपये भाडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 9:20 AM

पनवेलमध्ये खासगी वाहनधारकांकडून सर्रास लूट

अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : पनवेल आगारातील बस गेल्या अडीच महिन्यांपासून बंद आहेत. यादरम्यान एसटी बसस्थानकात खासगी वाहनांनी ठाण मांडले आहे. वाढीव प्रवास दर घेत सर्रास प्रवाशांची लूट सुरू केली आहे. महाड, माणगावसाठी मराठी बोलणारा आला तर त्यास इकोधारकाकडून ३०० रुपये घेतले जातात, तर त्या मार्गावर परप्रांतीय आल्यास त्याच्याकडून ४०० रुपये वसूल केले जात आहेत. दिवसेंदिवस खासगी वाहनधारकांची दादागिरी वाढत चालली आहे. त्यास आळा बसविणे गरजेचे आहे.

८ नोव्हेंबरपासून पनवेल आगारातील लालपरी रुसल्याने पनवेल ग्रामीणसह शहरी भागात खासगी वाहनधारकांनी कब्जा केला आहे. रीतसर दर न आकारता मनमानी दर आकारण्यास सुरुवात केली आहे. यावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. पनवेल बसस्थानक परिसरात सकाळपासून ते रात्रीपर्यंत खासगी वाहने भरण्यासाठी रस्त्यावर आडवीतिडवी लावली जात आहेत. एका ट्रीपसाठी २०० ते ४०० रुपयांपर्यंत दर आकारत आहेत. यासाठी एजंट नसले तरी स्वत:च गाडीत जोरजोरात आवाज देऊन प्रवासी भरत आहेत.

एजंटगिरी नाही; पण वाहने स्वत:च भरतातपनवेल परिसरात एजंटगिरी नसल्याचे दिसून आले आहे. इको, वडाप गाड्या स्वत:च भरतात. मात्र जास्त दर आकारत आहेत, तर पर्याय नसल्याने प्रवासी पैसे देत आहेत. अलिबाग, महाड, माणगाव यासाठी खासगी वाहने दिवसभर प्रवासी भरतात.

एसटीच्या कमी फेऱ्याआठवडाभरापासून अलिबाग, पेण महाड मार्गावर ५ एसटी सुरू झाल्या आहेत. मात्र, एसटीच्या कमी फेऱ्या असल्यामुळे त्याचा फायदा खासगी वाहनधारकांना झाला आहे. संप काळात दोन महिन्यांपासून एसटी बंद असल्याने खासगी वाहनधारकांची मनमानी वाढली आहे.

प्रशासनाकडून फेऱ्या वाढविण्याचे प्रयत्नप्रवाशांना एसटी बंद असल्याचा त्रास होऊ नये यासाठी खासगी वाहनचालकांना परवानगी दिली आहे. जास्तीचे दर वसूल करीत असतील तर तक्रारीनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले आहे, तर जास्तीत जास्त बस सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत. बस वाढल्या की खासगी वाहने कमी होतील. एसटी फेऱ्या वाढविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे एसटी महामंडळ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :ST Strikeएसटी संपBus DriverबसचालकNavi Mumbaiनवी मुंबई