शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

३०० हेक्टर भातशेती पडीक

By admin | Published: May 11, 2016 2:17 AM

तालुक्यातचे भौगोलिक क्षेत्र २६ हजार ५२५ हेक्टर असून, शहरी ३ किमी व ग्रामीण ४२ किमी सागरीकिनारा लाभलेल्या तालुक्यात ७५ गावे व ७५ हजार लोकसंख्या आहे

मुरुड : तालुक्यातचे भौगोलिक क्षेत्र २६ हजार ५२५ हेक्टर असून, शहरी ३ किमी व ग्रामीण ४२ किमी सागरीकिनारा लाभलेल्या तालुक्यात ७५ गावे व ७५ हजार लोकसंख्या आहे. भातशेती व मासेमारी हा लोकांचा प्रमुख व्यवसाय. भातशेती क्षेत्र तालुक्यात ३ हजार ९०० हेक्टर केवळ कागदावर उरले आहे. उधाणाचे पाणी शेतात घुसून सुमारे ७०० ते ८०० हेक्टर जमीन खारफुटी तसेच खाजणाने व्यापाली आहे. प्रत्यक्षात २,९०० हेक्टर भातशेती लागवडीखाली आहे. याचा अर्थच असा की सुमारे ३०० हेक्टरहून अधिक जमीन लागवडीखाली नाही. भाताला योग्य हमी भाव मिळत नसल्याने भात शेती परवडत नसल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे भाताचे कोठार असलेल्या मुरूड तालुक्यात भात क्षेत्र कमी होत आहे.अत्यल्प भूधारकांना शासकीय पातळीवर प्रोत्साहन पर आर्थिक साहाय्य देऊ केल्यास पडीक क्षेत्र भातशेतीखाली वा पीक पद्धतीत बदल करून लावगडीयोग्य करता येईल. श्रमाला प्रतिष्ठा असून शेतीतून सोने पिकविता येईल, असा विश्वास देण्यासाठी लोकप्रबोधनाची गरज आहे. कृषी विभागातर्फे असे प्रयत्न व्हावेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. शेती धारण क्षेत्राचा विचार करीत १५ ते २० गुंठे इतके अल्पभूधारक असलेल्यांची संख्या ७५ ते ८० टक्के इतकी असून, १ एकर क्षेत्र असलेल्यांची संख्या २० ते २५ टक्के एवढी भरते. १ एकर क्षेत्र असलेली जमीन लागवडीखाली आहे. भात शेती पडीक राहण्याचे मुख्य कारण म्हणजे शेती लागवडीसाठी लागणारा खर्च आणि खरीप हंगामात मिळणारे आताचे उत्पन्न याचे प्रमाण व्यस्त आहे. शेत लागवडीखाली नांगरणी, रानभाजणी, संकरीत भाताचे वाण पेरणी, लावणी, रासायनिक खते, आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन, कापणी, मळणी आदींचा खर्च प्रतिएकरी १३ हजार ते १३ हजार ५०० इतका येतो. तर प्रत्यक्ष प्रति एकरी भाताचे उत्पन्न जेमतेम १२ हजार ते १२ हजार ५०० इतकेच मिळते. तत्पर्य भातशेतीचा व्यवसाय हा आतबट्ट्याचा समजतात. शासनाकडून भाताला हमीभाव नाही. प्रति क्विंटल एक हजाराने भात विकावे लागल्यावर अगतिक शेतकरी कसा जगणार, अशी प्रतिक्रिया खार आंबोलीचे सरपंच मनोज कमाने यांनी दिली. त्यांच्या मते पाणलोट योजनेचा कालावधी संपत आला तरी अनुदान न मिळणे ही क्रूर थट्टा आहे. (वार्ताहर)