पनवेलमध्ये 300 हजयात्री; पालिकेच्या वतीने आरोग्य तपासणी व लसीकरण शिबीर
By वैभव गायकर | Published: May 29, 2023 06:36 PM2023-05-29T18:36:22+5:302023-05-29T18:36:35+5:30
लसीकरण शिबीराचे आयोजन केले आहे.
लोकमत न्युज नेटवर्क, वैभव गायकर, पनवेल: पनवेल महानगरपालिका क्षेत्रातुन 300 हज यात्री सौदे अरेबियासाठी रवाना होणार आहेत.यादृष्टीने पनवेल महानगरपालिकेने महानगरपालिका आणि महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रूग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानातून हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूसांठी मेंदूज्वर (मेनिन्गोकोक्क्ल वॅक्सीन) व हंगामी ताप (सिझनल इन्फ्लुन्झा वॅक्सीन) लसीकरण शिबीराचे आयोजन केले आहे.
आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 30 मे व 3 जून रोजी महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रूग्णालयात हे शिबीर आयोजित केले आहे.पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सुमारे 300 हून अधिक नागरिकांनी हज यात्रेसाठी लसीकरणाकरिता नाव नोंदणी केली आहे. या सर्वांचे येत्या 3 जून रोजी लसीकरण महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रूग्णालयात करण्यात येणार आहे.यासाठी पनवेल महानगरपालिका उपजिल्हा रूग्णालयास वैद्यकिय आरोग्यअधिकारी, वाहन व इतर आवश्यक सहकार्य करण्यात येणार आहे.हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंनी या लसीकरण शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने आयुक्त गणेश देशमुख करण्यात आले आहे.