नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी ३ हजार टनभाजीपाल्याची आवक झाली आहे. आवक वाढल्याने वाटाणा, फरसबी, टोमॅटोसह बहुतांश भाज्यांचे दर घसरले आहेत. ढोबळी मिर्ची व कोथिंबीरचे दर मात्र अद्याप तेजीत आहेत.
राज्याच्या कानाकोपऱ्यातून व काही प्रमाणात इतर राज्यातून दिवसभरात ६४१ वाहनांमधून भाजीपाला बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आला आहे. यामध्ये ३ हजार टन फळ भाज्या व ४ लाख ७७ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. उन्हाळा सुरू झाल्यामुळे भाव चांगले मिळतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कृषी माल मुंबईमध्ये पाठविला आहे. पण आवक वाढल्यामुळे बाजारभावात काही प्रमाणात घसरण झाली आहे.
आवळा, बीट, भेंडी, फरसबी, फ्लॉवर, गाजर, घेवडा, कैरी, कारली, कोबी, शेवगा शेंग, दोडका, टोमॅटो, तोंडली, वाटाणा, वांगी, कांदापात व पालकच्या दरामध्ये घसरण झाली आहे. बहुतांश सर्व भाज्यांचे दर कमी झालेले असताना या आठवड्यात ढोबळी मिर्ची, दुधी भोपळा, कोथिंबीर व मेथीच्या दरामध्ये मात्र वाढ झाली आहे. यापुढे उन्हाची तीव्रता जशी वाढेल तशी बाजारभावामध्येही तेजी येईल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
एक आठवड्यातील भाजीपाल्याचे प्रतीकिलो बाजारभाववस्तू - ४ मार्च - १२ मार्चआवळा २५ ते ३५ - २० ते ३०बीट २० ते ३५ - १६ ते २०भेंडी १५ ते ४० - २४ ते ३४फरसबी २५ ते ३५ - २२ ते २८फ्लॉवर १५ ते २५ - ८ ते १२गाजर २० ते ३५ - १२ ते १६घेवडा २८ ते ४८ - २४ ते ३०कैरी ४५ ते ६५ - ४० ते ५०कारली २५ ते ४० - २८ ते ३४कोबी १० ते २५ - १२ ते २०ढोबळी मिर्ची - ३० ते ५० - ४० ते ६०शेवगा शेंग - ४० ते ७० - ३५ ते ४५दोडका २० ते ५० - ३२ ते ३८टोमॅटो १० ते २५ - १० ते १४तोंडली २० ते ५५ - ३२ ते ५०वाटाणा ३० ते ५० - ३२ ते ४०वांगी २० ते ३५ - १६ ते ३०दुधी भोपळा २५ ते ३५ - ३० ते ३६
पालेज्यांचे प्रतीजुडी दरकांदापात ८ ते १२ - ६ ते ८कोथिंबीर ८ ते १२ - १० ते १५मेथी ७ ते १० - १० ते १५पालक ८ ते १२ - ६ ते ७