लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पावसाळ््याच्या दरम्यान झाडे उन्मळून पडण्याची शक्यता असते, अशावेळी अपघातांची संभाव्यता लक्षात घेता पावसाळ््यापूर्वी याबाबत ठोस उपाययोजना करणे आवश्यक असते. महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मृत आणि धोकादायक वृक्ष तसेच फांद्याच्या छाटणी याबाबत योग्य कार्यवाहीला सुरुवात झाली असून ३० मेपूर्वी सर्व विभागातील वृक्ष छाटणीचे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. महानगरपालिकेच्या उद्यान अधीक्षक विभागाच्या वतीने विभागनिहाय कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार कार्यवाहीला सुरुवात झाली आहे. मृत अथवा धोकादायक झाडे हटविणे, झाडांची छाटणी करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक विभागातील वृक्षांची पाहणी केली जात असल्याची माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांनी दिली.
वृक्ष छाटणीला ३१ मेची डेडलाइन
By admin | Published: May 09, 2017 1:36 AM