बेलापूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजकरिता 3.5 चटईत्र मिळणार
By नारायण जाधव | Published: June 27, 2023 06:41 PM2023-06-27T18:41:39+5:302023-06-27T18:41:48+5:30
आजही सर्व सामान्य व गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते.
नवी मुंबई : आजही सर्व सामान्य व गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागत होते. बुद्धीमत्ता असूनही तरुणांना व तरुणींना डॉक्टरकी मिळण्यापासून वंचित राहावे लागत होते. याचा गंभीर विचार बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केला. त्यानुसार त्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजसाठी शासन दरबारी सतत पाठपुरावा केल्यामुळे आज सर्व सामान्य रुग्णांना व वैदकीय महाविद्यालय व रुग्णालयामुळे फायदा होणार आहे व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणांना व तरुणींना यांना मोठा लाभ मिळणार आहे.
याच अनुषंगाने म्हात्रे यांनी मंगळवारी सिडकोचे नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक अनिल दिग्गीकर यांच्या दालनात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजच्या प्रकल्प, नवी मुंबईतील विविध समस्याबद्दल बैठक पार पडली. यावेळी म्हात्रे यांनी सांगितले की, सदरचा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व मेडिकल कॉलेजचा पूर्ण प्रोजेक्ट प्लान तयार असून सदर प्रकल्प हा 8.40 एकरामध्ये उभारला जाणार असून अंदाजे 819.30 कोटी खर्च येणार आहे. जर भूखंड हस्तांतरणानंतर महापालिकेला 3.5 COMMERCIAL FSI हा जर हस्तांतरित केला तर येणाऱ्या व्यावसायिकच्या उत्पन्नातून सदर हॉस्पिटलचा खर्च चालेल. यावर सदर व्यवस्थापकीय संचालक अनिल दिग्गीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सदरचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश दिले.
तसेच त्यापुढे म्हणाल्या की, गेली सतत 2 वर्षे पाठपुरावा करीत असलेले बेलापूर गावातील जो मोकळा भूखंड आहे त्याचा वापर हा गोडाऊन म्हणून वापर केला जातो तो भूखंड हा “खेळाचे मैदान” म्हणून सिडकोने घोषित करून तो नवी मुंबई महानगरपालिकेला हस्तांतरित करून लवकरात लवकर मैदान खुले करावे. तसेच ग्रोमा असोशियनच्या मार्केट 2 (धान्य बाजार) मधील व्यापारांच्या अडचणी, NRI वसाहतीतील क्लब हाउस व इतर समस्या, जुईनगर येथील गणपती मंदिराच्या भूखंडा संदर्भात व सानपाडा येथील सेक्टर – 24 मधील भूखंड क्र. डी-63 या भूखंडाचे सन 2004 च्या बाजारभावाप्रमाणे देण्यात यावे अश्या विविध समस्या म्हात्रे यांनी दिग्गीकर यांच्या समोर मांडल्या. यावर त्यांनी सकारत्मक प्रतिसाद देत सदर प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश सबंधित अधिकाऱ्यांना दिले.