उरण : जेएनपीटीने भाड्याने दिलेल्या एका गाेडाउनमधील कंटेनरला शुक्रवारी आग लागल्याने हुक्क्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपये किमतीच्या सुमारे ३५ टन गोळ्या आगीत भस्मसात झाल्या. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने जीवितहानी झाली नाही. स्पीडी वेअरहाउसिंगमधील पाच नंबरच्या गोदामात कार्गो कंटेनर ठेवण्यात आला होता. या कंटेनरमध्ये हुक्का पार्लर आणि हुक्कापार्टीसाठी वापरण्यात येणाऱ्या काळ्या गोळ्यांचा साठा करण्यात आला होता. शुक्रवारी दुपारी अचानक या कंटेनरला आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. जेएनपीटी, सीएफएलाचे दोन बंब वॉटर टॅंकरचा वापर आणि कंटेनर पलटी करून दोन तासांनी कंटेनरला लागलेली आग विझविण्यात आली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
हुक्का पार्टीच्या ३५ टन गोळ्या कंटेनरच्या आगीत भस्मसात; कोट्यवधींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 11:25 AM