पनवेलमध्ये गाड्यांच्या तपासणीत ३६ लाख रुपये जप्त
By नारायण जाधव | Published: April 25, 2024 12:18 PM2024-04-25T12:18:50+5:302024-04-25T12:19:44+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत पनवेल विधानसभा मतदारसंघांमध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाने गाड्यांची तपासणी करत तब्बल 36 लाख रुपये जप्त केले आहेत.
नवीन पनवेल - मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत पनवेल विधानसभा मतदारसंघांमध्ये स्थिर सर्वेक्षण पथकाने गाड्यांची तपासणी करत तब्बल 36 लाख रुपये जप्त केले आहेत.
24 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता पळस्पे फाटा पनवेल येथे कार्यरत स्थित सर्वेक्षण पथक नियमित तपासणी करत होते. यावेळी गाडी क्रमांक एम एच 43 बीवाय 8949 नेव्ही ब्ल्यू रंगाची चार चाकी टाटा नेक्सन गाडीमध्ये 12 लाख 99 हजार 900 रुपये रक्कम जप्त करण्यात आली. गाडीमध्ये आझाद कुमार राजेंद्र कडवा आणि राजेश कुमार इंदलिया (राहणार स्टील मार्केट कळंबोली) हे प्रवास करत होते. प्राथमिक चौकशी केली असता डीडीव्हीएन स्टील कंपनी या कंपनीची रक्कम असून त्यांचा कोणत्याही राजकीय पक्षाशी व राजकीय व्यक्तीशी संबंध असल्याचे दिसून आले नाही. तर 22 एप्रिल रोजी स्थिर सर्वेक्षण पथक क्रमांक पाच यांनी गाडी क्रमांक एम एच ०६ सी एच 8868 महिंद्रा कंपनीच्या थार गाडी मधून 23 लाख रुपये तपासणी दरम्यान जप्त केली. ही रक्कम योगेश हारे यांची असल्याची तपासणी दरम्यान समोर आले. याबाबत पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू असून तपासानंतर नियमोचित कार्यवाही करण्यात येईल असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांनी सांगितले.