तळोजा कारागृहातून किरकोळ गुन्ह्यातील ३८ कैद्यांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 11:55 PM2018-10-06T23:55:42+5:302018-10-06T23:55:59+5:30
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत पाच वर्षांच्या आतील शिक्षा सुनावलेल्या व छोट्या गुन्ह्यात अटक असलेल्या तळोजा जेलमधील ३७ कैद्यांची नुकतीच सुटका करण्यात आली. शिक्षा पूर्ण होण्याअगोदरच सुटका झाल्याने कैद्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला.
पनवेल : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत पाच वर्षांच्या आतील शिक्षा सुनावलेल्या व छोट्या गुन्ह्यात अटक असलेल्या तळोजा जेलमधील ३७ कैद्यांची नुकतीच सुटका करण्यात आली. शिक्षा पूर्ण होण्याअगोदरच सुटका झाल्याने कैद्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त केंद्राच्या गृहविभागाकडून तब्बल १०० कैद्यांना विशेष माफी देण्यात आली. त्याचा सर्वाधिक लाभ तळोजा तुरुंगातील कैद्यांना मिळाला. या तुरुंगातील ३७ आरोपींना मुक्त करण्यात आले आहे. विशेष माफी दिलेल्या कैद्यांचे तीन दिवस महात्मा गांधी यांची शिकवण व विचार याविषयी प्रबोधन करण्यात आले. ज्यांच्यावर गंभीर गुन्हे नाहीत, ज्यांचे वय ५५ वर्षांपेक्षा जास्त आहे, तसेच ज्यांनी ६६ टक्के शिक्षा भोगली आहे, अशांना विशेष माफी देण्यात आली. शिक्षेत कपात केलेले कैदी पुन्हा वाईट मार्गावर जाऊ नयेत याविषयी प्रबोधन केल्याची माहिती कारागृह अधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर यांनी दिली.