बेलापूर मतदारसंघातील दलितवस्ती सुधारणांसाठी 4 कोटी; राज्य शासनाची मंजुरी :मंदा म्हात्रेंचा पाठपुरावा
By नारायण जाधव | Published: March 2, 2023 07:39 PM2023-03-02T19:39:32+5:302023-03-02T19:40:14+5:30
बेलापूर विधानसभा क्षेत्रातील दलित वस्ती येथे विविध सुखसुविधा पुरविणेसाठी बेलापूरच्यै आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांजकडे मागणी केली होती.
नवी मुंबई- बेलापूर विधानसभा क्षेत्रातील दलित वस्ती येथे विविध सुखसुविधा पुरविणेसाठी बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांजकडे मागणी केली होती. तसेच सतत शासन दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब सामाजिक विकास योजनेअंतर्गत रु. 4 कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
सीबीडी सेक्टर-8 रमाबाई आंबेडकरनगर येथील नाल्याला संरक्षक भिंत व ब्रिज बांधणे, रमाबाई नगर येथे समाजमंदिर बांधणे, रमाबाई नगर येथे उद्यान विकसित करणे, नेरुळ शिवाजीनगर येथे नागरी आरोग्य केंद्र उभारणे, नेरुळ गांधीनगर येथे बालवाडी उभारणे, गांधी नगर येथे समाजमंदिर व जलकुंभ उभारणे, तुर्भे हनुमान नगर येथे व्यायामशाळा उभारणे, इंदिरानगर येथे समाजमंदिर उभारणे या कामांचा समावेश आहे. सद्यस्थितीत रु. 4 कोटींना मंजुरी दिल्याने विकासकामांना लवकरच सुरुवात होणार आहे.