हार्बरवर ४ दिवसांचा ट्राफिक ब्लॉक सुरू, ४८२ गाड्यांपैकी १६४ गाड्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 03:51 AM2017-12-23T03:51:38+5:302017-12-23T03:51:54+5:30
बेलापूर-सीवूड-उरण रेल्वेमार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेचा शुक्रवारी मध्यरात्रीपासून ते सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. उरणच्या दिशेने जाणारा नवीन रेल्वेमार्ग सीवूड आणि बेलापूर दरम्यानच्या सध्याच्या रेल्वेमार्गाला जोडण्यात येणार आहे. यासाठी हार्बरमार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून, अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्याचा हार्बरमार्ग फेज १ प्रकल्प फलाट क्रमांक ४ ला जोडण्यात येणार आहे.
प्राची सोनवणे
नवी मुंबई : बेलापूर-सीवूड-उरण रेल्वेमार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेचा शुक्रवारी मध्यरात्रीपासून ते सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. उरणच्या दिशेने जाणारा नवीन रेल्वेमार्ग सीवूड आणि बेलापूर दरम्यानच्या सध्याच्या रेल्वेमार्गाला जोडण्यात येणार आहे. यासाठी हार्बरमार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून, अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्याचा हार्बरमार्ग फेज १ प्रकल्प फलाट क्रमांक ४ ला जोडण्यात येणार आहे.
दरम्यान, बेलापूरच्या पुढे जाणाºया प्रवाशांची यामुळे मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. कारण बेलापूरच्या पुढील खारघर, मानसरोवर, खांदेश्वर आणि पनवेल या स्टेशनवरून प्रवास करणाºयांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
हे काम मध्यरात्रीपासून सुरू झाले असून, त्यातून फेºयांवरही परिणाम होणार आहे. या ब्लॉकचा भाग म्हणून २५ डिसेंबर रोजी १३ तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. या ट्राफिक ब्लॉकमुळे हार्बरच्या प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता आहे. हार्बरमार्गावर एकूण १२ नवीन रेल्वेस्टेशन बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी पाच रेल्वेस्टेशन पहिल्या टप्प्यात बांधण्याचे काम सुरू आहे.
हे काम अंतिम टप्प्यात असल्याने वेगाने हे काम पूर्ण करण्यासाठी बेलापूर ते नेरुळपर्यंत ट्राफिक ब्लॉक घेण्यात आल्याची माहिती रेल्वेने दिली.
...त्यानंतर लोकल पूर्ववत
सीवूड ते उरण या कामासाठी गुरुवार, शुक्र वार आणि शनिवार २२ डिसेंबर रोजी ३३ फेºया रद्द केल्या आहेत; पण त्या ऐवजी ३४ फेºया चालतील. रविवारी १२ लोकल फेºया बंद करत त्या बदल्यात २४ फेºया चालवल्या जातील. सोमवार, २५ डिसेंबर रोजी १३ तासांचा विशेष ब्लॉक असून, १०० फेºया रद्द करण्यात आल्या असून याच कालावधीत १०४ विशेष लोकल फेºया चालवल्या जातील. २५ डिसेंबर रोजीचा ब्लॉक दुपारी ३पर्यंत असून, त्यानंतर फेºया पूर्ववत चालतील.
मध्य रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक-
पादचारी पुलाच्या गर्डरचे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेने रात्रकालीन विशेष ब्लॉक घोषित केला आहे. २३ डिसेंबरला रात्री १० वाजून ५० मिनिटे ते २४ डिसेंबरला पहाटे ४ वाजून २० मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत मेल-एक्स्प्रेससह उपनगरीय लोकल फेºयांवरदेखील परिणाम होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी रात्री ८.५६ची आसनगाव लोकल टिटवाळा स्थानकापर्यंत चालवण्यात येईल. आसनगावहून सुटणारी रात्री ११.०८ची ठाणे लोकल रद्द करण्यात आली आहे. तसेच काही मेल-एक्स्प्रेस पर्यायी मार्गावर वळविण्यात येतील.
ट्रान्स हार्बरमार्गावरील गाड्या वेळापत्रकानुसार
शनिवारी दिवसभरात बेलापूरहून सुटणाºया आणि बेलापूरहून धावणाºया ६५ गाड्यांपैकी ३१ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर १८ गाड्या बेलापूरऐवजी पनवेलपर्यंत चालविण्यात येणार आहेत. चार गाड्या नेरुळपर्यंत चालविण्यात येणार आहेत. तर दहा वाशी स्थानकापर्यंत आणि दोन मानखुर्द स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहेत. ट्राफिक ब्लॉक दरम्यान ट्रान्स हार्बरमार्गावरील गाड्या वेळापत्रकानुसार चालविण्यात येणार आहेत.
४८२ गाड्यांपैकी १६४ गाड्या रद्द
च्रविवारी पहाटे २ ते सोमवारी पहाटे २ असा ट्राफिक ब्लॉक फलाट क्रमांक २वर असणार आहे. या काळात १२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर पनवेल येथून १०, नेरूळ येथून ४ आणि वाशीतून १० अशा २४ विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. सकाळी गर्दीच्या वेळेत बेलापूर येथून दोन गाड्या फलाट क्रमांक ३वरून चालविण्यात येणार आहेत. तर संध्याकाळी गर्दीच्या वेळी चार गाड्यांपैकी तीन गाड्या चालविण्यात येणार आहेत. यामधील एक गाडी वाशीपर्यंत चालविली जाणार आहे. दिवसभरात बेलापूरपर्यंतच्या ३६ गाड्यांपैकी १२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. १० गाड्या पनवेलपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. ४ गाड्या नेरूळ येथे थांबविण्यात येणार आहेत. तसेच १० वाशी आणि २ मानखुर्द येथे थांबतील. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, उरण रेल्वेमार्गाचे अंतिम टप्प्यातील काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी हा ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार हे सुट्टीचे दिवस असल्याने फारशी गर्दी होणार नाही. तसेच प्रवाशांचे हाल होऊ नयेत, याकरिता नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाला जादा गाड्या सोडण्याची विनंती करण्यात आली असून, प्रवाशांना या बसेसचा आधार घेता येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
च्सोमवारी पहाटे २ ते दुपारी ३ या काळात नेरुळ ते पनवेल अप आणि डाउन या मार्गावर ट्राफिक ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. हार्बरमार्गावरील ४८२ गाड्यांपैकी १६४ गाड्या रद्द करण्यात आाल्या आहेत. तर ट्रान्स हार्बरमार्गावरील २३० गाड्यांपैकी ४० गाड्या रद्द करण्यात आल्या आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
महानगरपालिका परिवहन विभागामार्फत
प्रवाशांकरिता अतिरिक्त बससेवेची सुविधा
मध्य रेल्वेने हार्बर मार्गावर ट्राफिक ब्लॉकच्या चार दिवसांच्या कालावधीमध्ये परिवहन विभागामार्फत प्रवाशांकरिता अतिरिक्त बससेवेची सुविधा पुरविली जाणार आहे. २२ ते २४ डिसेंबरदरम्यान बेलापूर रेल्वे स्टेशनवरून सुटणाºया लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी लोकल सेवा चालू राहणार आहे. त्यामुळे या कालावधीत बससेवेची आवश्यकता भासणार नाही. मात्र, सोमवार, रविवार मध्यरात्री २ वाजल्यापासून ते सोमवार २५ डिसेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत नेरूळ ते पनवेल ही लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याकरिता नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्र माने पुढीलप्रमाणे बससेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. हार्बर रेल्वेमार्गावरील ब्लॉकदरम्यान वरील चार मार्गांवर ४० बसेस धावतील.