बेरोजगारांची ४ लाखांना फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 11:45 PM2020-10-02T23:45:45+5:302020-10-02T23:46:08+5:30
मार्च, २०२० मध्ये एका महिलेने त्याला फोन करून एचडीएफसी बँकेमध्ये नोकरी मिळेल, असे सांगितले.
नवीन पनवेल : एचडीएफसी बँकेत नोकरीला लावतो, असे सांगून तरुणाची ३ लाख ९६ हजार ७०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे. आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पनवेल येथील विक्रांत देवधरला नोकरीची गरज होती. त्यासाठी त्याने नोकरी डॉट कॉम या वेबसाइटवर बायोडाटा अपडेट केला होता. मार्च, २०२० मध्ये एका महिलेने त्याला फोन करून एचडीएफसी बँकेमध्ये नोकरी मिळेल, असे सांगितले. त्यानंतर, समोरच्या व्यक्तीने वेबसाइटवरून विक्रांतच्या मेल आयडीवर आॅफर लेटर, जोइनिंग लेटर आणि एक वर्षाचा बाँड पाठवला होता.
त्यानंतर, विक्रांतला त्याने बँकेतून ३२ हजार ७०० रुपये भरण्यास सांगितले. विक्रांतने हे पैसे भरल्यानंतर पुन्हा मनीष अग्रवालने फोन करून काही रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. विक्रांतने क्रमाक्रमाने रक्कम भरली. त्यानंतर, ड्रेस कोडसाठी जवळपास दोन लाख रुपये भरण्यास सांगितले असता, विक्रांतने पैसे भरले. वारंवार पैसे भरण्यासाठी सांगितले जात असल्याने, विक्रांतला फसवणुकीचा संशय आला आणि त्याने त्याचे भरलेले पैसे परत मागितले, तसेच पैशाबद्दल विचारणा केली असता, समोरील व्यक्तीने उडवाउडवीची उत्तरे दिली.