दोन वर्षांत 402 मोबाइल लंपास; नवी मुंबई, पनवेलमध्ये तक्रारी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 12:31 AM2021-02-10T00:31:16+5:302021-02-10T00:31:30+5:30

गर्दीच्या ठिकाणांवर पाळत

402 mobile lamps in two years | दोन वर्षांत 402 मोबाइल लंपास; नवी मुंबई, पनवेलमध्ये तक्रारी दाखल

दोन वर्षांत 402 मोबाइल लंपास; नवी मुंबई, पनवेलमध्ये तक्रारी दाखल

Next

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई :  नवी मुंबईसह पनवेल मधून दोन वर्षात ४०२ मोबाइल चोरीला गेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी अथवा एकट्या पादचाऱ्याला गाठून चोरटयांनी हा डाव साधलेला आहे. मात्र त्यापैकी केवळ १८१ मोबाईल पुन्हा मिळाले आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मोबाईल चोरटे वाढले आहेत. पहाटेच्या सुमारास अनेकजण घराचा दरवाजा उघडा ठेवून घरातले काम करतात. अथवा एखादी व्यक्ती घराबाहेर घेल्यास दरवाजा उघडाच राहतो. अशा उघड्या घरांवर पाळत ठेवून दरवाजातून किंवा खिडकीतून मोबाईल चोरले जात आहेत. त्याशिवाय गर्दीच्या ठिकाणी, बस थांब्यावर देखील हातातले किंवा खिशातले मोबाइल मारले जात आहेत. तर रात्रीच्या वेळी एकट्या पादचाऱ्याला गाठून मोबाइल चोरल्याचा घटना घडल्या आहेत. त्यानुसार दोन वर्षात ४०२ मोबाइल चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी केवळ १८१ गुन्ह्यांची उकल होऊन त्यामधील मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. इतर गुन्ह्यांचा अद्याप उलगडा झालेला नसून त्यामधील मोबाइल पोलीस अथवा संबंधितांच्या हाती लागलेले नाहीत.

गर्दीच्या ठिकाणी सतर्कता गरजेची 
मोबाइल चोरी करणाऱ्या टोळ्या गर्दीच्या ठिकाणी आपली हातसफाई दाखवत असतात. यामुळे बसथांबे, बस, रेल्वे अशा ठिकाणी ते दबा धरून बसलेले असतात. एखादी व्यक्ती बेसावध अवस्थेत असल्याचे त्यांच्या निदर्शनास येताच त्यांच्याकडून हातसफाईने मोबाइल चोरला जातो. तर अनेकदा एकटा प्रवासी बघून आडोशाच्या ठिकाणी त्याच्याकडील मोबाइल हिसकावून पळवला जातो. यामुळे पादचाऱ्यांमध्येदेखील चोरट्यांची दहशत पसरत आहे. 

गुन्हेगारांकडून होऊ शकतो गैरवापर 
मोबाइल हरवल्यास अथवा चोरीला गेल्यास तातडीने पोलिसांकडे तक्रार करणे गरजेचे आहे. अनेकदा चोरीला गेलेला मोबाइल गुन्हेगारांच्या हाती लागल्यास त्याचा वापर एखाद्या गुन्हेगारी कृत्यासाठी केला जाऊ शकतो. यामुळे मोबाइल चोरीची तक्रार दाखल असल्यास संबंधितावरील संकट टळू शकते. शिवाय हल्लीच्या स्मार्टफोनमध्ये असलेली ट्रॅकिंगची सुविधादेखील वापरली जाणे गरजेचे आहे. तर मोबाइलमध्ये वापरले जाणारे महत्त्वाचे बँकिंग किंवा इतर ॲप्लिकेशनदेखील पासवर्डने लॉक ठेवणे गरजेचे आहे. 

हरवले ४०२, सापडले १८१ 
लॉकडाऊनमुळे २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये मोबाइल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. २०१९ मध्ये २३० मोबाइल चोरीच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त होत्या. मात्र गतवर्षात केवळ १७२ तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी एकूण १८१ गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यामध्ये गतवर्षी ८१ तर २०१९ मध्ये १०० गुन्हे उघड झाले आहेत. त्यापैकी बहुतांश गुन्ह्यांत ठरावीक टोळीचा किंवा एखाद्या चोरट्याचा समावेश आढळून आला आहे. त्यात बहुतांश चोरटे शहराबाहेरील आहेत.

या मोबाइलचा वापर गुन्ह्यासाठी होऊ शकतो. यामुळे गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहणे गरजेचे आहे. तर रस्त्याने चालताना अथवा दुचाकीवर असताना हातात मोबाइल ठेवू नये. घरातदेखील दरवाजा व खिडकीच्या जवळपास मोबाइल ठेवू नये. 
- सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १सागरी पोलीस ठाण्याच्या गस्ती

Web Title: 402 mobile lamps in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :theftचोरी