नवी मुंबई : शहरात भटक्या श्वानांची संख्या वाढली असून, मागील नऊ महिन्यांत शहरात ११ हजार ४० नागरिकांना चावा घेतला असल्याची नोंद झाली आहे. या संख्येवरून दररोज सरासरी साधारण ४१ जणांना श्वान चावल्याचे समोर आले आहे. मोकाट व भटक्या श्वानांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून, महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर नाराजी व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई शहरातील बेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा परिसरातील रस्ते, कचराकुंड्या, सिडको वसाहती, गाव-गावठाण, झोपडपट्टी आदी भागात भटक्या श्वानांचे प्रमाण अधिक असून, शहरातील लहान मुले, नागरिक, फेरीवाले, अनोळखी व्यक्ती यांना चावा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिक आणि हॉटेल व्यावसायिक उरलेले अन्न कचरा कुंडी अथवा रस्त्याच्या कडेला टाकतात. त्यामुळे अन्नाच्या शोधात असलेल्या श्वानांची संख्या अशा परिसरांमध्ये वाढली असून, नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. शहरातील मोकाट व भटक्या श्वानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून श्वान नियंत्रण कार्यक्रम कंत्राटी पद्धतीने राबविला जातो.
आजारी, तसेच जखमी झालेल्या श्वानांवर श्वान नियंत्रण केंद्रात उपचार केले जातात, तसेच उपचारानंतर बरे झाल्यावर त्यांना त्यांच्या मूळ जागेवर पुन्हा सोडण्यात येते. रस्त्यात अचानक वाहनांना आडवे आल्यामुळे, तसेच दुचाकींचा पाठलाग करताना शहरात सातत्याने अपघात घडत आहेत. अशा अपघातांमध्ये जखमी झालेल्या अनेक श्वानांचा मृत्यूदेखील झाला आहे. शहरात १ एप्रिल ते ३१ डिसेंबर या काळात श्वानदंश झालेल्या सुमारे ११ हजार ४० नागरिकांना महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये लस देण्यात आली आहे. भटक्या आणि मोकाट श्वानांमुळे नागरिक हैराण झाले असून, या श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.४११० श्वानांवर उपचारआजारी असलेल्या, तसेच जखमी झालेल्या भटक्या श्वानांवर महापालिकेच्या माध्यमातून उपचार केले जातात. एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२३ या नऊ महिन्यांत शहरातील सुमारे ४११० श्वानांवर उपचार करण्यात आले असून, १०३१ श्वानांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील श्वानांवर उपचार, निर्बीजीकरण लसीकरण आदी केले जात असल्याने शहरात श्वानांची संख्या वाढण्याचे प्रमाण कमी आहे. महापालिका रुग्णालयात नवी मुंबई महापालिका हद्दीबाहेरील रुग्णदेखील उपचारासाठी येत असल्याने श्वानदंश झालेल्यांची संख्या वाढली असल्याची शक्यता आहे. - डॉ. श्रीराम पवार, पशुवैद्यकीय अधिकारी, न.मुं.म.पा.महिना - श्वानदंश - पकडलेले श्वान - लसीकरण केलेले श्वान - उपचार केलेले श्वानएप्रिल - १२६८ - ६८३ - १०० - ५७६मे - १२८४ - ५९६ - १०७ - ४९२जून - १२३१ - ६९४ - १०१ - ५९४जुलै - ८४२ - ६४५ - १४९ - ४८६ऑगस्ट - ८८० - ६७३ - १५५ - ५२६सप्टेंबर - ११३३ - ५७२ - १०९ - १०८ऑक्टोबर - १४७४ - ६३५ - १११ - ५३१नोव्हेंबर - १३६६ - ४६५ - ७४ - ३८९डिसेंबर - १५६२ - ५३४ - १२५ - ४०८