शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

राज्यातील २६ महापालिकांना ४२० कोटींची लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 6:37 AM

महामुंबईतील सहा महापालिकांचा मुद्रांक उत्पन्नातील वाटा १५१.४० कोटी

- नारायण जाधवनवी मुंबई : राज्यातील जमिनी आणि घरे व दुकानांच्या खरेदी-विक्रीतून मिळणाऱ्या मुद्रांकाच्या उत्पन्नामुळे ठाणे जिल्ह्यासह राज्यातील सर्व २६ महापालिकाही मालामाल झाल्या आहेत. 

महापालिका अधिनियमात सुधारणा केल्यानंतर त्या त्या शहरातून शासनाकडून मिळणाऱ्या एकूण मुद्रांकातून एक टक्का रक्कम स्थानिक महापालिकांना देण्याचे बंधन घातले आहे. त्यानुसार, नगरविकास विभागाने राजधानी मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व २६ महापालिकांना २०२२-२३ या वर्षांतील ४२० कोटी रुपयांच्या अनुदानाचा पहिला हप्ता मंगळवारी वितरित केला. यात पालघरच्या वसई महापालिकेसह ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांना १५१ कोटी ३९ लाख ७० हजार ३०३ रुपये मिळाले आहेत. यात सर्वाधिक ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकेला मिळाले आहेत.

राज्यात सर्वाधिक पुणे महापालिकेला १२९ कोटी ७३ लाख, तर त्याखालोखाल पिंपरी-चिंचवड महापालिकेला ६१ कोटी २८ लाख रुपये आणि नाशिक महापालिकेला २१ कोटी ७० लाख आणि नागपूर महापालिकेला १९ कोटी ३० लाख रुपये मिळाले आहेत. नागपूरच्या अनुदानातून १ कोटी ९१ लाख २३ हजार रुपये आयुर्विमा महामंडळाच्या कर्जाच्या हप्त्याचे कापून घेतले आहेत. नागपूरसह औरंगाबादच्या सात कोटी १४ लाख ४५ हजार ४२७ रुपयांच्या अनुदानातून एक कोटी २२ लाख ६८ हजार १०० तर वसई-विरारच्या २० कोटी ३८ लाख १५ हजार ५४ रुपये अनुदानातून २८ हजार ७०० रुपये कापून घेण्यात आले आहेत.

ठाणे जिल्ह्यातील महापालिकांना मिळालेली रक्कम महापालिका     मिळालेले अनुदानठाणे         ४४ कोटी ३४ लाख ८ हजार ३५०       केडीएमसी          २३ कोटी ४९ लाख ९८ हजार ३८४मीरा-भाईंदर      १९ कोटी ३५ लाख २० हजार ३८५उल्हासनगर         एक कोटी ७५ लाख ८६ हजार ९६२भिवंडी          दोन कोटी ८१ लाख ३० हजार २५८नवी मुंबई         २२ कोटी तीन लाख २८ हजार ६७९वसई          २० कोटी ३८ लाख १५ हजार ५४एकूण         १५१ कोटी ३९ लाख ७० हजार ३०३ रुपये

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका