नवी मुंबईत एकाच दिवसात ४३ बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 05:09 AM2020-04-29T05:09:52+5:302020-04-29T05:10:16+5:30

मंगळवारी एकाच दिवसात ४३ रुग्ण वाढले असून शहरातील एकूण रुग्णसंख्या १८८ झाली आहे.

43 affected in a single day in Navi Mumbai | नवी मुंबईत एकाच दिवसात ४३ बाधित

नवी मुंबईत एकाच दिवसात ४३ बाधित

Next

नवी मुंबई : नवी मुंबईमधील कोरोनाचे संकट वाढतच असून तीन दिवसात तब्बल ८० रुग्ण आढळले आहेत. मंगळवारी एकाच दिवसात ४३ रुग्ण वाढले असून शहरातील एकूण रुग्णसंख्या १८८ झाली आहे. नवी मुंबईत मंगळवारी सर्वाधिक १६ रुग्ण तुर्भे सानपाडा परिसरातील आहेत. कोपरखैरणेमध्ये ९, घणसोलीत ७, वाशीत ५, ऐरोलीत ३, नेरूळमध्ये २ व बेलापूरमध्ये १ रुग्ण आढळला आहे. रविवारपासून तीन दिवसात ८० रुग्ण वाढल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
दरम्यान, नवी मुंबईमधून शेकडो नागरिक मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी जात आहेत. यामध्ये डॉक्टर, नर्स, पोलीस, बेस्ट चालक, वाहक व इतरांचा समावेश आहे. मुंबईत गेल्यामुळे कोरोना होण्याचे प्रमाण ६३ टक्के आहे. यामुळे नागरिकांनी शहराबाहेर जाऊ नये असे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे.
>पनवेलमध्ये तीन रुग्णांची नोंद
पनवेल महापालिका हद्दीत मंडळवारी दोन नवे रुग्ण आढळले तर ग्रामीण भागात एक नवीन रुग्ण सापडला आहे. पालिका हद्दीत रुग्णांची संख्या ५७ झाली आहे.तर ग्रामीण भागात रुग्ण संख्या १० झाली आहे.विशेषत: पालिका हद्दीतील तीन रुग्ण आज बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आले.

Web Title: 43 affected in a single day in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.