पनवेल शहर परिसरात गर्दीच्या ठिकाणी ४४ सीसीटीव्ही कॅमेरे

By वैभव गायकर | Published: August 12, 2023 04:04 PM2023-08-12T16:04:01+5:302023-08-12T16:04:20+5:30

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, उमेश इनामदार व प्रकाश खैरे तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

44 CCTV cameras at crowded places in Panvel city area | पनवेल शहर परिसरात गर्दीच्या ठिकाणी ४४ सीसीटीव्ही कॅमेरे

पनवेल शहर परिसरात गर्दीच्या ठिकाणी ४४ सीसीटीव्ही कॅमेरे

googlenewsNext

वैभव गायकर 

पनवेल : पनवेलकरांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शहरामध्ये गर्दीच्या व महत्वाच्या ठिकाणी पनवेल शहर पोलीस ठाण्याच्यावतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे कॅमेरे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे मत आमदार प्रशांत ठाकूर यांनी दि.12 रोजी पनवेल शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन सीसीटीव्ही कंट्रोल रूमची पाहणी करते वेळी केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, उमेश इनामदार व प्रकाश खैरे तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  नितीन ठाकरे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना पनवेल शहर परिसरात गर्दीच्या ठिकाणी सद्य स्थितीत बसवण्यात आलेल्या ४४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आणि त्यांचा कंट्रोल रूम पनवेल शहर पोलीस ठाण्यात आधुनिक पद्धतीने या वॉर रूममध्ये आगामी काळात स्पीकर यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याद्वारे एखाद्या ठिकाणी गर्दी झाल्यास किंवा कोणती दुर्घटना घडल्यास या कंट्रोल मधूनच स्पीकरच्या माध्यमातून पोलीस मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हा प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथमच पनवेलमध्ये राबवला जाणार असल्याची माहिती वपोनि नितीन ठाकरे यांनी दिली. त्यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कंट्रोल रूमची पाहणी केली. शहरातील गर्दीची ठिकाणे, बाजारपेठ, सराफ बाजार, मिरची गल्ली, आदी ठिकाणच्या वाहतूक कोंडी संदर्भात सुद्धा चर्चा झाली व लवकरच वाहतूक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आगामी सणासुदीच्या काळामध्ये शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे पनवेल शहरात अजूनही जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज असल्याने यांसंदर्भात सुद्धा आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन सुद्धा त्यांनी यावेळी दिले.

Web Title: 44 CCTV cameras at crowded places in Panvel city area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.