रिक्षामध्ये राहिलेले ५० हजार रुपये दिले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 01:27 AM2019-11-08T01:27:47+5:302019-11-08T01:30:49+5:30
घणसोलीतील चालकाचा प्रामाणिकपणा
नवी मुंबई : घणसोलीमध्ये एका प्रवाशाची ५० हजार रुपयांची बॅग रिक्षामध्ये विसरली. रिक्षा चालक अनिल म्हात्रे यांनी ती प्रामाणिकपणे प्रवशाला परत दिली असून, या प्रामाणिकपणाविषयी म्हात्रे यांचे शहरवासीयांनी कौतुक केले आहे.
रिक्षाचालक अनिल बाबुलनाथ म्हात्रे गुरूवारी सकाळी घणसोली सेक्टर १६ येथून प्रवाशाला घेवून रेल्वे स्टेशनकडे गेले. म्हात्रे यांनी एका चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी रिक्षा उभी केली असता अचानक त्यांची नजर रिक्षाच्या मागील सीटवर असलेल्या पिशवीकडे गेले. त्यांनी चहा पिण्याचे टाळून थेट घणसोली स्थानिक प्रकल्पग्रस्त रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांच्याशी संपर्क साधून याविषयी माहिती दिली. प्रवाशाचा शोध घेवून ५० हजार रूपयांची रोखड परत केली आहे. सहा मिहन्याच्या कालावधीत घणसोली येथील रिक्षाचालकाकडून तीन लोकांच्या रिक्षात विसरलेल्या वस्तू, दागिने तसेच रोकड प्रामाणकिपणे केले आहेत. गेल्या मिहन्यात रामदास मढवी या रिक्षाचालकाला एक महागडया किमतीचा मोबाईल सापडला होता. तो महिला प्रवाशाला परत करण्यात आला.
प्रवाशांनी आपल्या साहित्यावर लक्ष ठेवले पाहिजे इतक्या मौल्यवान वस्तू किंवा रोकड वाहनात विसरू नये असे आवाहन रिक्षा चालक अनिल म्हात्रे यांनी केले आहे.