शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

नवी मुंबई पालिका उतरविणार ५०० कोटींच्या वास्तूंचा विमा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2018 5:53 AM

नवी मुंबई महापालिकेने आता आपल्या ग्रीन बिल्डिंग म्हणून देशभरात ख्याती प्राप्त केलेल्या बेलापूर येथील मुख्यालयासह वाशी येथील विष्णुदास नाट्यगृह आणि ऐरोली येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुरक्षिततेसाठी विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

- नारायण जाधवठाणे : नवी मुंबई महापालिकेने आता आपल्या ग्रीन बिल्डिंग म्हणून देशभरात ख्याती प्राप्त केलेल्या बेलापूर येथील मुख्यालयासह वाशी येथील विष्णुदास नाट्यगृह आणि ऐरोली येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुरक्षिततेसाठी विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.या तिन्ही वास्तूंची किंमत जागेसह ४५० ते ५०० कोटींवर आहे. यासाठी इच्छुक कंपन्यांकडून त्या कमीतकमी हप्त्यात जास्तीतजास्त किती नुकसानभरपाई देतात, यासाठी देकार मागवले आहेत.नवी मुंबई महापालिका क्षेत्रात या तिन्ही वास्तू त्यांच्या स्थापत्य आणि वास्तुसंरचनेमुळे आकर्षण ठरल्या आहेत. वर्षभरातून हजारो नागरिक त्यांना भेटी देतात, यामुळे त्यांच्या संरक्षणासाठी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या आदेशानुसार प्रशासनाने त्यांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला असल्याचे महापालिकेचे मालमत्ता विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी लोकमतला सांगितले.संभाव्य अपघात झाल्यास नुकसानभरपाई मिळून त्यातून झालेले नुकसान भरून काढणे, हाच उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेने अर्थसंकल्पात केलेल्या एक कोटीच्या तरतुदीतून या विम्याचा हप्ता भरला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.या गोष्टींचा काढणार विमाइच्छुक विमा कंपन्यांकडून महापालिकेने चार धोक्यांचा विचार करून प्रस्ताव मागवले आहेत. यात पहिला धोका म्हणजे आग, स्फोट, वादळ, पूर, भूकंप या नैसर्गिक आपत्तींचा समावेश आहे. दुसऱ्या धोक्यात सध्याच्या जगभरातील दहशतवादी हल्ले पाहता बॉम्बस्फोटांचा धोका लक्षात घेऊन प्रस्ताव मागवला आहे. कारण, यापूर्वी विष्णुदास भावे नाट्यगृहात हिंदुत्ववादी संघटनांनी एकदा स्फोट घडवला आहे.तिसरा धोका गॅसपाइपलाइनचा स्फोट, लिकेजसह शॉर्टसर्किटमुळे लागणाºया आगीचा आहे, तर चौथा धोका म्हणून प्रशासनाने दहशतवादी संघटना किंवा अपघात म्हणून वाहन किंवा विमानाची टक्कर या वास्तूंना बसल्यास होणाºया नुकसानीची भरपाई म्हणून विमा काढण्याचा निर्णय घेतला आहे.सरकारी विमा कंपन्यांना प्राधान्यविम्यासाठी सरकारी कंपन्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र, जास्तीतजास्त नुकसानभरपाई द्यायला हवी, तसेच यात एजंटला थारा नसणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई