मुंबई बाजार समितीत ५०० टन कांदा पडून!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 05:41 AM2018-12-07T05:41:16+5:302018-12-07T05:41:26+5:30

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होऊ लागल्याने बाजारभावाची घसरण सुरू आहे.

500 tonnes of onion fall in Mumbai market committee! | मुंबई बाजार समितीत ५०० टन कांदा पडून!

मुंबई बाजार समितीत ५०० टन कांदा पडून!

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होऊ लागल्याने बाजारभावाची घसरण सुरू आहे. ५०० टनांपेक्षा जास्त माल विक्री न झाल्यामुळे पडून आहे. चार दिवसांमध्ये जवळपास पाच टन माल सडला असून, मार्केटमध्ये दुर्गंधी पसरली आहे.
बाजारभाव घसरल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. नवीन कांदा मार्केटमध्ये आल्यामुळे उन्हाळी कांद्याचे भाव पडले आहेत. मुंबईमध्ये गुरुवारी ७० ट्रक व ५१ टेम्पो मिळून १२१ वाहनांमधून १३४४ टन मालाची आवक झाली आहे. बुधवारी १७४६ टन आवक झाली होती. मागणीपेक्षा आवक जास्त झाली असून माल ठेवायचा कुठे? असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. सर्व गोडाऊन भरली आहेत. मोकळ्या पॅसेजमध्येही शेकडो गोणींची थप्पी लावण्यात आली आहेत. लिलावगृहामध्येही पाय ठेवण्यास जागा नाही एवढा माल ठेवण्यात आला आहे. होलसेल मार्केटमध्ये ६ ते १२ रुपये किलो दराने विक्री होऊ लागली असून खराब झालेला माल ३ ते ५ रुपयांनाही विकला जात आहे. ग्राहकांनीही पाठ फिरवली असल्यामुळे विक्रीसाठी आलेल्या मालाचे करायचे काय? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
बाजार समितीमध्ये चार दिवसांमध्ये जवळपास पाच टन माल सडला आहे. लिलावगृहामध्ये गोणीमधून पाणी येऊ लागले असून सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली आहे. शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सडलेला माल मार्केटबाहेर काढण्यासाठीही प्रत्येक गोणीला दहा रुपये खर्च होऊ लागला आहे. कांदा मार्केटमधील व्यापारी सुरेश शिंदे यांनी सांगितले की आवक प्रचंड होऊ लागल्यामुळे सर्व मालाची विक्री होत नाही. विक्री न झाल्यामुळे माल खराब होण्याचे प्रमाण वाढत असून आवक नियंत्रणामध्ये येईपर्यंत अशी स्थिती होणार आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढल्याने दररोज १२१ ट्रक व टेम्पो भरुन कांद्याची आवक होत आहे. या कांद्याचे वजन सुमारे १३४४ इतके असते. मात्र, ग्राहकांनी पाठ फिरवल्याने कांदा गोदामात आणि बाहेर पडून आहे. मोठ्या प्रमाणात कांदा पडून राहिल्याने कुजत चालला आहे. त्यामुळेच तो ६ ते १२
रुपये प्रतिकिलो दराने विकावा लागत असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.
>राज्यातील प्रमुख मार्केटमधील आवक
मार्केट आवक (टन) दर (प्रतिकिलो)
मुंबई १३४४ ०६ ते १२
कोल्हापूर ०४५२ ०४ ते १२
अहमदनगर ३६९७ ०१ ते ११
चांदवड ११०० ०२ ते १०
उमराणे १७५० ०४ ते ११
पुणे १०४७ ०४ ते १२
पिंपळगाव २२४८ ०२ ते १२

Web Title: 500 tonnes of onion fall in Mumbai market committee!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :onionकांदा