म्हसळा तालुक्यातून ५१ उमेदवारांचे अर्ज दाखल

By admin | Published: February 7, 2017 04:15 AM2017-02-07T04:15:07+5:302017-02-07T04:15:19+5:30

येथे पंचायत समितीच्या चार तर जिल्हा परिषदेच्या दोन जागांसाठी ५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्वच पक्षांनी नवीन चेहरे दिले आहेत.

51 candidates filed nomination from Mhasla taluka | म्हसळा तालुक्यातून ५१ उमेदवारांचे अर्ज दाखल

म्हसळा तालुक्यातून ५१ उमेदवारांचे अर्ज दाखल

Next

म्हसळा : येथे पंचायत समितीच्या चार तर जिल्हा परिषदेच्या दोन जागांसाठी ५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्वच पक्षांनी नवीन चेहरे दिले आहेत.
स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेना, भाजपा, काँग्रेस आय, आरपीआय पक्षाने घेतल्यावर आधीच आघाडी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप युतीला म्हसळा पंचायत समितीच्या चार जागा व रायगड जिल्हा परिषदेच्या दोन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहणार असल्याचे दिसत आहे. ही निवडणूक युतीला जिंकण्यास सोपी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच आजी पदाधिकाऱ्यांच्या उमेदवारीला काट मारून सहाचे सहा उमेदवार नवखे दिले आहेत, तरीही सर्वच कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण असल्याचे निदर्शनास आले.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे म्हसळा पंचायत सभापती महादेव पाटील यांनी पक्षामार्फत केवळ जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते, त्यांची शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी घोषित न झाल्याने त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरे इच्छुक उमेदवार डॉ.मोईज शेख यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी नाकारल्याने त्यांनी काँग्रेस आयकडून वरवठणे गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या इच्छुक उमेदवारांची नाराजी असली तरी पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे चित्र होते. सोमवारी निवडणूक अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी झुंबड होती.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप युतीने सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला श्रीवर्धन मतदार संघात सर्वच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या जागा वाटणीला आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने सहाच्या सहा जागांवर अर्ज दाखल के ले. वरवठणे गण इतर मागास प्रवर्गाकरिता घुमचे सरपंच मधुकर गायकर, मेंदडी गण सर्वसाधारण महिला जागेसाठी छाया म्हात्रे, आंबेत गण सर्वसाधारण महिला जागेसाठी आरक्षित असून ही जागा कणघर येथील उज्वला सावंत यांना तर पाभरे सर्वसाधारण जागेसाठी संदीप चाचले यांचे तर पाभरे जिल्हा परिषद गट इतर मागास प्रवर्ग जागेसाठी धनश्री पाटील आणि वरवठणे इतर मागास प्रवर्ग गटासाठी बबन मनवे या सहा उमेदवारांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या तिकिटावर पक्षाचे युवा नेते अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्वाचन अधिकारी अपूर्वा वानखेडे यांच्याकडे अर्ज दाखल केले. या वेळी तालुका अध्यक्ष अनंत सावंत, तालुका नेते अली कौचाली, जिल्हा परिषद प्रतोद वैशाली सावंत, व्यंकटेश सावंत, महिला अध्यक्षा रेश्मा काणसे, महेश शिर्के आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेकडून वरवठणे जिल्हा परिषद गटासाठी माजी उपसभापती रवींद्र लाड, वरवठणे पंचायत समिती गणासाठी कोले सरपंच अमोल पेंढारी, मेंदडी पंचायत समिती गणासाठी निर्मला कांबळे, पाभरे पंचायत समिती गणासाठी हेमंत नाक्ती, आंबेत गण प्रवेशा पारावे तर पाभरे जिल्हा परिषद गटासाठी निशा पाटील, मेंदडी गण झिनत नजिरी, आंबेत गण आलिया चरफरे, वरवठणे गट डॉ.मोईज शेख,पाभरे गट ललिता बसवत, भाजपाने पाभरे गणासाठी प्रकाश रायकर,आंबेत गण धनश्री मुंडे, वरवठणे गण गोविंद भायदे, मेंदडी गण सुनंदा पाटील, जिल्हा परिषद गट गणेश बोर्ले, पाभरे गट मीना टिंगरे यांनी तर एकमेव पाभरे गणासाठी आरपीआयच्या सुधारक येलवे यांच्यासह ५१ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. साऱ्यांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहेत. अंतिम चित्र १५ फे बु्रवारीला स्पष्ट होणार आहे. (वार्ताहर)


सुधागडात १७ जागांसाठी १९ अर्ज
1 पाली : तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची झुंबड उडाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसअखेर जिल्हा परिषदेच्या दोन गटासाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये जिल्हा परिषद जांभूळपाडा गटातून रवींद्र देशमुख ( शिवसेना ) यांनी एकाच जागेसाठी एकूण तीन अर्ज दाखल केले. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून गीता पलेचा यांनी देखील एकाच जागेसाठी तीन अर्ज दाखल केले तर सुनील मोरे ( शिवसेना ) यांनी दोन अर्ज दाखल केले. तसेच दीपक पवार यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमधून अर्ज दाखल केला आहे. 2आॅनलाइनच्या गोंधळामुळे एकाच उमेदवारावर दोन-दोन अर्ज दाखल करण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषद पाली गटातून ४ उमेदवारी अर्ज दाखल झाले. सुरेश खैरे व सायली खैरे (शेकाप) तर शिवसेना राजेंद्र राऊत, मनसेकडून प्रथमच जिल्हा परिषदेसाठी उदय सावंत यांनी अर्ज दाखल केले. पंचायत समिती परळी गणासाठी संजना दिवेकर ( राष्ट्रवादी ) तर उज्ज्वला देसाई ( शिवसेना ) यांनी एकाच जागेसाठी ३ अर्ज, स्मिता परब (राष्ट्रवादी) रु पाली देसाई ( शिवसेना) 3जांभूळपाडा गणसाठी बहाडकर जयवंत ( शेकाप) रमेश सुतार (शिवसेना) यांनी एकाच जागेसाठी २ अर्ज तर मिलिंद बहाडकर (शेकाप) यांनी अर्ज दाखल केले. पंचायत समिती पाली गणासाठी साठी सविता हंबीर (शेकाप) किसान हंबीर (शेकाप) कृष्णा हंबीर (भाजपा) नाडसूर पंचायत समितीस्ठी साक्षी दिघे (राष्ट्रवादी) सुषमा कदम (शिवसेना), रेखा साळुंके (राष्ट्रवादी) निहारिका शिर्के (अपक्ष) सीमा उतेकर (अपक्ष ) उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत.

Web Title: 51 candidates filed nomination from Mhasla taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.