शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

खारघरमध्ये होणार प्रदूषणरुपी ५१ फुटांच्या रावणाचं दहन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2020 12:50 PM

प्रदूषणाकडे लक्ष वेधण्याचा खारघर फोरमचा प्रयत्न

- वैभव गायकरपनवेल- तळोजा औद्योगिक वसाहती मधून रात्रीच्या वेळी हवेत सोडणाऱ्या प्रदूषण विषयी शासनाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केला जात असल्याने खारघर फोरमच्या वतीने आज दसऱ्याच्या दिवशी खारघर सेक्टर १५ घरकुल शेजारील मोकळ्या मैदानात ५१ फूट प्रदूषण रावण दहन केले जाणार आहे.       संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.तळोजा औद्योगिक वसाहती मधून रात्रीच्या वेळी सोडणाऱ्या वायू प्रदूषण मुळे खारघर, कामोठा, कळंबोली, रोडपाली, तळोजा ,पनवेल आदी   परिसरातील नागरिक त्रस्त आहे.रात्रीच्या वेळी खिडक्या बंद करून झोपावे लागत आहे. पहाटेच्या वेळी मॉर्निंगओक साठी  घराबाहेर पडल्या नंतर रासायनिक  वायू मिश्रित  दुर्गंधी मुळे श्वास घेताना त्रास होत असल्याचे निदर्शनास येताच खारघर, कामोठा, कळंबोली, रोडपाली, तळोजा खांदेश्वर  परिसरातील  विविध 20 पेक्षा जास्त संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच खारघरमध्ये पार पडली.या बैठकीत तळोजा औद्योगिक वसाहतीत होणाऱ्या प्रदूषण विषयी,   प्रदूषण नियंत्रण महामंडळकडे लेखी तक्रार करूनही योग्य दखल घेतली जात नाही. एकीकडे काही कंपन्या बंद केल्याचे सांगतात.मात्र प्रदूषण  कमी होताना दिसत नाही. दसरा होताच प्रदूषण विरोधात तीव्र लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी दसऱ्याचा दिवशी  प्रदूषण रावण दहन केले जाणार असल्याची माहिती नगरसेविका व फोरमच्या अध्यक्षा लीना अर्जुन गरड यांनी दिली.या प्रदूषण दहन कार्यक्रमात पनवेल परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गरड यांनी केले आहे.