पनवेल : केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानअंतर्गत विविध रस्त्यालगत ५१५० वृक्षांची लागवड व उद्यानाचा विकास पनवेल महानगरपालिका क्षेत्रात करणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष अमर पाटील यांनी बैठकीनंतर दिली.पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवार १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता महापलिका भवनात झाली. केंद्र शासनाने अमृत अभियानंतर्गत हरित क्षेत्र विकास प्रकल्प राबविण्याकरिता ५० टक्के केंद्र शासन २५ टक्के राज्य शासन व २५ टक्के महापालिकेने खर्च करावयाचे आहेत.२०१५-१६ साठी बैठकीत १ कोटी रु पयांना मंजुरी देण्यात आली. यामधून इच्छापूर्ती गणपती मंदिर पनवेल बस स्थानकाच्या मागे, साईनगर गार्डन पनवेल येथील उद्यानाचे आणि टाटा हॉस्पिटल कॉर्नर सेक्टर ३५ ते ३६ मेन रोड खारघर, तळोजा फेज २ सेक्टर २५ ते कोयनावेळे रस्ता, धानसर गाव ते पनवेल-मुंब्रा हायवेपर्यंतचा रस्ता, कळंबोली सर्कल ते खांदा वसाहतीपर्यंतच्या रस्त्यालगत ५१५० वृक्षांचे रोपण करणार आहे.यावेळी संतोष भोईर, तेजस कांडपिळे, नेत्रा पाटील, रामजी बेरा, गोपीनाथ भगत, कुसुम म्हात्रे, मनोहर म्हात्रे, संजय भोपी आदी उपस्थित होते.
पनवेल मनपा करणार ५१५० वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 2:32 AM