मुंबई महानगर प्रदेशातील ९ शहरांना ५२३ कोटी; १५ व्या वित्त आयोगाचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 06:14 AM2022-11-01T06:14:59+5:302022-11-01T06:15:12+5:30

मुंबई महानगर प्रदेशातील ९ शहरांच्या वाट्याला ५२३ कोटी आले असून एकट्या मुंबई महापालिकेस ३२२ कोटी रुपये मिळाले आहेत.

523 crore to 9 cities in Mumbai Metropolitan Region; 15th Finance Commission Fund | मुंबई महानगर प्रदेशातील ९ शहरांना ५२३ कोटी; १५ व्या वित्त आयोगाचा निधी

मुंबई महानगर प्रदेशातील ९ शहरांना ५२३ कोटी; १५ व्या वित्त आयोगाचा निधी

Next

- नारायण जाधव

नवी मुंबई : राज्यातील मिलेनियम प्लस २१ शहरांना १५ व्या वित्त आयोगांतर्गत पाणीपुरवठा आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी २०२१-२२ या वर्षासाठीचे ७९९ कोटींचे भरीव अनुदान नगरविकास विभागाने वितरीत केले आहे. यात मुंबई महानगर प्रदेशातील ९ शहरांच्या वाट्याला ५२३ कोटी आले असून एकट्या मुंबई महापालिकेस ३२२ कोटी रुपये मिळाले आहेत.

स्वच्छ भारत अभियानात महत्त्वाचा घटक असलेल्या घनकचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर करून क्षेपणभूमी, कचऱ्यापासून खतनिर्मिती, वीजनिर्मिती, घनकचऱ्यापासून विटा बनविणे यासारखे प्रकल्प राबविता येणार आहेत. यातून या शहरांतील रस्तोरस्ती दिसणारे कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी दूर होऊन देशातील स्वच्छ भारत अभियानातील त्यांची रँकिंग वाढण्यासही मदत होणार आहे.

स्वच्छ भारतची रँकिंग वाढणार-

या निधीतून या शहरांना आपापल्या हद्दीतील पाणीटंचाई असलेल्या परिसरातील पाणीपुरवठा योजना राबविता येणार आहेत. यामुळे अनेक शहरांतील पाणीपुरवठ्यातील त्रुटी दूर होऊन मुबलक पाणी मिळून तेथील स्थानिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Web Title: 523 crore to 9 cities in Mumbai Metropolitan Region; 15th Finance Commission Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.