फुकट्यांच्या प्रवासाने साडे पाच कोटींचा फायदा; रेल्वेची धडक मोहिम

By कमलाकर कांबळे | Published: January 15, 2024 07:28 PM2024-01-15T19:28:07+5:302024-01-15T19:28:52+5:30

कोकण रेल्वेची धडक मोहीम : ३ महिन्यांत १८,४६६ जणांवर कारवाई

5.5 crore benefit for free travel railways; Railway's Dhad campaign | फुकट्यांच्या प्रवासाने साडे पाच कोटींचा फायदा; रेल्वेची धडक मोहिम

फुकट्यांच्या प्रवासाने साडे पाच कोटींचा फायदा; रेल्वेची धडक मोहिम

नवी मुंबई : कोकण रेल्वेच्या विविध मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात कोकण रेल्वेने धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत मागील तीन महिन्यात १८,४६६ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून ५ कोटी ६९० लाख ९९ हजार १७ रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कोकण रेल्वेच्या विविध मार्गावरील गाड्यांतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. ही बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वेने प्रत्येक गाड्यांतून नियमित तपासणी मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी विशेष पथकांची नेमणूक केली आहे. या पथकाने डिसेंबर महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या ६६७५ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून १ कोटी ९५ लाख ६४ हजार ९२६ रुपयांचा दंड वसूल केला होता, तर ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यात तपासणी मोहिमेत १८,४६६ प्रवासी विनातिकीट आढळून आले आहेत. त्यांच्यावर कारवाई करून ५ कोटी ६० लाख ९९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, प्रत्येक मार्गावरील गाड्यांतून ही तपासणी मोहीम सुरूच राहणार असून, गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.

Web Title: 5.5 crore benefit for free travel railways; Railway's Dhad campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.