- योगेश पिंगळे नवी मुंबई : शहरातील मान्सूनपूर्व कामे करताना मोठ्या आणि धोकादायक वृक्षांची छाटणी होणे गरजेचे आहे, परंतु या वर्षी महापालिकेच्या दुर्लक्षामुळे वृक्षांची छाटणी करण्याच्या कामाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने, दोन महिन्यांत सुमारे ५५३ हून अधिक वृक्ष कोसळल्याने नागरिकांच्या मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, तर अनेक वृक्ष अद्याप धोकादायक स्थितीमध्ये आहेत.नवी मुंबई शहराची रचना ही साधारण एका बाजूला खाडी आणि दुसऱ्या बाजूला डोंगर अशी आहे. शहराची पर्यावरणपूरक शहर म्हणून ओळख निर्माण व्हावी, यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहेत. महापालिकेच्या माध्यमातून शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले जाते. प्रदूषण टाळण्याच्या अनुषंगाने खासगी संस्थेच्या सहकार्याने शहरात ई-सायकल आणि ई-बाइक प्रणाली राबविण्यात आली आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून अशा विविध अत्याधुनिक संकल्पना राबविल्या जात असल्या, तरी शहराची जडणघडण पाहिलेल्या शहरातील मोठ्या वृक्षांच्या सुरक्षेकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नवी मुंबई शहरातील मान्सूनपूर्व कामांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. मान्सूनपूर्व कामे करताना शहरातील धोकादायक, अडसर ठरणाºया, तसेच मोठ्या वृक्षांची छाटणी करण्यात आली नव्हती. त्यामुळे ३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात शहरात सुमारे २५३ वृक्ष उन्मळून पडले, तसेच अनेक वृक्षांच्या मोठ्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या. वृक्ष कोसळ्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक नागरिकांच्या घरांचेही नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात ३ तारखेपासून सहा दिवस शहरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. या पावसात शहरातील सुमारे ७७ वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या. वाहनांचही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. ३ आॅगस्ट रोजी सोसाट्याच्या वाºयासह पाऊस बरसू लागला. या वाºयामुळे पुन्हा शहरातील सुमारे १७० हून अधिक झाडांचे नुकसान झाले असून, झाडांखाली उभ्या असलेल्या वाहनांचेही नुकसान झाले आहे. या वर्षी जून महिन्यापासून शहरातील एकूण ५५३ झाडे कोसळली असून, १५ हून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे.झाडांच्या छाटणीसाठी अनेक नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत, परंतु या तक्रारींकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. महापालिकेने शहरातील पदपथावरील झाडांच्या मुळावर काँक्रिट आणि पेव्हर ब्लॉक बसविल्याने झाडे कमकुवत झाली असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला. मान्सूनपूर्व कामे करताना मोठ्या आणि धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून त्यांची छाटणी, तसेच सदर झाडांजवळ धोकादायक असल्याचे फलक बसविणे गरजेचे होते, परंतु दुर्लक्ष केल्याने वृक्षांची पडझड झाली आहे.वाहने पार्किंगची समस्या कायमशहरात वाहनांच्या पार्किंगसाठी नियोजन नसल्याने नागरिकांना सोसायट्यांबाहेरील रस्त्याच्या कडेला वाहने उभी करावी लागत आहेत. झाडांची छाटणी न झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांवर झाडे कोसळून नुकसान होत आहे.रहदारीला अडथळारस्ते आणि पदपथावर पडलेली झाडे आणि फांद्या सुमारे चार दिवसांनंतरही उचलल्या जात नाहीत. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत असून, महापालिकेच्या कामकाजावर नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.गृहनिर्माण संस्थांमधील झाडांचा कचरा रस्त्यावरसोसायट्यांतर्गत झाडांची छाटणी झाल्यावर होणाºया कचºयाची विल्हेवाट सदर सोसायटीने लावायची असते, परंतु शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था छाटणी झाल्यावर किंवा कोसळलेल्या झाडाच्या फांद्या सोसायटीच्या बाहेरील पदपथ अथवा कचराकुंडीजवळ टाकतात. सदर कचरा पदपथ आणि रस्त्यावर अडथळा ठरत असल्याने नाईलाजाने महापालिकेला उचलावा लागत आहे.ऐरोलीत एकाचा मृत्यूशहरात जुलै महिन्यात पडलेल्या पावसात ऐरोली येथे एटीएमच्या बाहेर पैसे काढण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांवर झाड कोसळण्याची घटना घडली. यामध्ये एका नागरिकाला जीव गमवावा लागला होता, तर दोन नागरिक जखमी झाले होते.वाशीत पोलीस कर्मचाºयाच्या घरावर कोसळले झाडनवी मुंबई : वाशीतील पोलीस वसाहतीमध्ये झाड कोसळून पोलीस कर्मचाºयाच्या घराचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी फांद्या कापताना योग्य काळजी न घेतल्याने हा प्रकार घडला आहे. वाशी सेक्टर १ मधील पोलीस वसाहतीमध्ये पावसामुळे एक झाड कोसळले होते.या झाडाच्या फांद्या शनिवारी अग्निशमन दलाचे कर्मचारी कापत होते. त्यावेळी झाडाचा बुंधा व फांद्या झाडाशेजारील रूम नंबर ए४९ वर कोसळेल अशी शक्यता तेथील रहिवासी पोलीस नाईक दीपक बसवंत यांनी व्यक्त केली होती.परंतु अग्निशमन कर्मचाºयांनी योग्य काळजी न घेतल्याने साडेचार वाजता झाडाचा काही भाग घरावर कोसळला. यात घराचा पत्रा तुटला आहे. सुदैवाने घरातील चारही सदस्यांना काहीही झाले नाही. पत्रे तुटल्याने पावसाचे पाणी घरात शिरण्याची शक्यता आहे. या प्रकरणी निष्काळजीपणा करणाºयांवर कारवाई व्हावी व घराची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
दोन महिन्यांत कोसळले ५५३ वृक्ष; नवी मुंबई महापालिकेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 1:05 AM