प्राची सोनवणे, नवी मुंबईमहाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेची पुर्वतयारी सुरु आहे. ही परीक्षा २८फेब्रुवारी ते २५ मार्चपर्यंत चालणार आहे. एकूण ५५७ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. यात ठाणे, मुंबई, रायगड विभागातील ३ लाख, ३८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहे. बुधवारपासून ग्रेड तसेच प्रात्यक्षिक परीक्षेला सुरुवात झाली असून २५फेबृवारीला संपणार आहे.मुंबई विभागीय बोर्डांतर्गत ठाणेमधील १४८, रायगडमधील ३९, पालघरमधील ३५,दक्षिण मुंबईमधील ८७, मुंबई पश्चिम विभागातील १४६, तर मुंबई उत्तर विभागातील १०२ अशा एकूण ५५७ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. त्यासाठी प्रत्येक केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. या परीक्षेकरिता एकूण ६८ परीरक्षण केंद्रांची निवड करण्यात आली आहे. बारावीची परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यासाठी केंद्र प्रमुख, अतिरिक्त केंद्र प्रमुख तसेच परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदल्या दिवसापर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची संधीगेल्या वर्षी परीक्षेत अयशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना बुधवारी १७ फेब्रुवारीपर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. यामध्ये रिपीटर्स, श्रेणीसुधार तसेच तुरळक विषय घेऊन बसलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असणार असून अतिविलंब, अतिविशेष, परीक्षा फी वसूल करून परीक्षेला बसण्याची संधी दिली जाणार आहे. मूळ परीक्षा फी ३२५ रुपये असून, मुदतीनंतर मूळ परीक्षा फीवर प्रतिदिन ५० रुपये व त्यानंतर दिवसाला १०० व २०० रुपये आकारले जातात.
५५७ केंद्रांवर होणार बारावीची परीक्षा
By admin | Published: February 10, 2017 5:10 AM