५८३ केंद्रांवर होणार बारावीची परीक्षा, २१ फेब्रुवारीपासून सुरुवात, मोबाइल वापरास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 01:28 AM2018-02-10T01:28:18+5:302018-02-10T01:28:50+5:30

महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाºया बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यात ठाणे, मुंबई, रायगड विभागांतील जवळपास तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहेत.

583 centers to be examined for HSC, beginning from Feb 21, mobile usage ban | ५८३ केंद्रांवर होणार बारावीची परीक्षा, २१ फेब्रुवारीपासून सुरुवात, मोबाइल वापरास बंदी

५८३ केंद्रांवर होणार बारावीची परीक्षा, २१ फेब्रुवारीपासून सुरुवात, मोबाइल वापरास बंदी

Next

- प्राची सोनवणे

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाºया बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यात ठाणे, मुंबई, रायगड विभागांतील जवळपास तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहेत.
मुंबई विभागीय बोर्डांतर्गत ठाणे, रायगड, पालघर, दक्षिण मुंबई, मुंबई पश्चिम विभाग, तर मुंबई उत्तर विभागातील ५८३ परीक्षाकेंद्रांवर परीक्षा होणार आहे. यासाठी ७४ परिक्षण केंद्रांची निवड केली आहे. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी केंद्रप्रमुख, अतिरिक्त केंद्रप्रमुख, तसेच परीक्षकांची नियुक्ती केली आहे.
गेल्या वर्षी व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणा-या प्रश्नपत्रिकेवर शासनाकडून निर्णय होईल. Þयावेळी प्रश्नपत्रिकेची पाकिटे वर्गातच उघडण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची संधी
गेल्या वर्षी परीक्षेत अयशस्वी ठरलेल्या, विषय न सुटलेल्या विद्यार्थ्यांना बुधवार, १७ फेब्रुवारीपर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. यामध्ये रीपिटर्स, श्रेणीसुधार, तसेच तुरळक विषय घेऊन बसलेल्यांचा समावेश असून अतिविलंब, अतिविशेष, परीक्षा फी वसूल करून परीक्षेला बसण्याची संधी दिली जाणार आहे. मूळ परीक्षा फी ३२५ रुपये असून, मुदतीनंतर मूळ परीक्षा फीवर प्रतिदिन ५० रुपये व त्यानंतर दिवसाला १०० व २०० रुपये आकारले जातात.

स्मार्ट फोनच्या वापरावर पूर्णपणे बंदी ठेवण्यात आलेली आहे. याकरिता सर्वच केंद्रातील मुख्याध्यापकांच्या विशेष बैठका घेऊन याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षाकेंद्रावर केवळ केंद्रसंचालक मोबाइल फोनचा वापर करू शकणार आहेत. परीक्षार्थींनी मोबाइल फोन आणूच नये, असे आवाहन बोर्डाच्या वतीने करण्यात आले आहे.
- डॉ. सुभाष बोरसे, प्रभारी सचिव, राज्य माध्यमिक व
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई

Web Title: 583 centers to be examined for HSC, beginning from Feb 21, mobile usage ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा