गुन्हेगारी पार्श्वभूमीचे ५९ उमेदवार रिंगणात
By admin | Published: May 21, 2017 03:23 AM2017-05-21T03:23:44+5:302017-05-21T03:23:44+5:30
पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल ५९ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. यात सर्वाधिक म्हणजेच, २२ उमेदवार भाजपाचे आहेत.
- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल ५९ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. यात सर्वाधिक म्हणजेच, २२ उमेदवार भाजपाचे आहेत. यापैकी १६ जणांवर खुनाचे प्रयत्न, अपहरण, फसवणूक आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. भाजपाखालोखाल शेकापने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या १२ जणांना उमेदवारी दिली आहे.
पनवेल महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. सोमवारी सांयकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत शेकापने महाआघाडीच्या माध्यमातून भाजपासमोर आव्हान निर्माण केले आहे. भाजपाने सर्वच्या सर्व म्हणजेच, ७८ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यापैकी तब्बल २२ उमेदवारांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. यातील १६ जणांवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. महाआघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शेकापने ६२ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. त्यापैकी १२ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तर त्यातील चार जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शिवसेनेच्या ६२ पैकी ७ उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. यातील ४ जणांवर खुनाचा प्रयत्न, अपहरण, फसवणूक आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रवादीने ६ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यातील एकावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. तर मनसेच्या २५ उमेदवारांपैकी एकूण सहा जणांवर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. यातील चार जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे.
- पनवेल महापालिकेच्या २0 प्रभागांतून ७८ नगरसेवकांची निवड होणार आहे. त्यासाठी
414
उमेदवार रिंगणात आहेत. यातील १४ टक्के म्हणजेच, ५९ उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. यात सर्वाधिक उमेदवार भाजपाचे आहेत.
पक्षएकूण गुन्हेगारी गंभीर
उमेदवारपार्श्वभूमीगुन्हे
भाजपा७८२२१६
शेकाप५४१२८
शिवसेना६२७४
मनसे२५६४
बीएसपी१0११
एनसीपी६११
भारिप बी. एम.२५११
प्रहार जन. पक्ष ३११
अपक्ष/इतर१५१८७