शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येतील राम मंदिर बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, तामिळनाडूतून ईमेल, सुरक्षा यंत्रणा अलर्ट!
2
शिंदे यांची दादांविरूद्ध तक्रार, अमित शाह यांच्या उत्तराचा राऊतांकडून सस्पेन्स
3
चैत्र संकष्ट चतुर्थी: राशीनुसार ‘या’ मंत्रांचे जप करा, भरघोस लाभ मिळवा; कोणते उपाय करावेत?
4
Tariff War: चायनीज एअरलाइन्सला जिनपिंग यांचं 'फर्मान'; ट्रम्प यांना तगडा झटका! होणार मोठं नुकसान?
5
लाडकी बहीण योजनेतील ८ लाख महिलांना ५०० रुपयेच मिळणार? राज्यमंत्र्यांनी खरे काय ते सांगितले
6
बंगाल हिंसाचाराचे बांगलादेश कनेक्शन; पैशांचे फंडिंग झाल्याचे पुरावे, रामनवमीची ठरली होती तारीख
7
यावर्षी १०५ टक्के पाऊस होणार, हवामान विभागाचा मान्सूनबद्दलचा ताजा अंदाज
8
पलक तिवारीला डेट करतोय का? इब्राहिम अली खानने पहिल्यांदाच दिलं उत्तर, म्हणाला...
9
कष्टाचं फळ! ChatGPT वापरुन घराचं रिनोव्हेशन, बहिणींनी 'अशी' केली लाखो रुपयांची बचत
10
"माझ्या अहंकारामुळे सिनेमा हातातून गेला", रणदीप हुडाचा खुलासा; 'रंग दे बसंती' मध्ये दिसला असता
11
मुस्कान -साहिलच्याही एक पाऊल पुढे, महिलेचे २ तरुणांशी संबंध; पतीविरोधात रचला डाव अन्...
12
मृत्यूनंतर माणसाचे काय होते? आत्मा सात जगांच्या प्रवासाला निघतो...; ऑक्सफर्डच्या फिलॉसॉफरने सांगितले...
13
‘असे ड्रेस आम्ही ऑनलाइन विकतो!’ अमेरिकन प्रेस सेक्रेटरीचा ड्रेस मेड इन चायना, अमेरिकेची फजिती
14
आता तुमच्या खात्यातून बायकोही करू शकणार पेमेंट; UPI मध्ये आलं नवीन फीचर
15
भाजपा पदाधिकाऱ्यावर दबा धरून बसलेल्या तरुणाचे कोयत्याचे वार, हत्येने बीड जिल्हा हादरला
16
नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी: बुधवारी गणेश पूजनाला विशेष महत्त्व; पाहा, महात्म्य, मान्यता
17
"एक घोळ झालाय, हा सूरज चव्हाणचा बायोपिक नाही", 'झापुक झुपूक' सिनेमाबाबत केदार शिंदेंचा मोठा खुलासा
18
राधिका मदानने केली सर्जरी? व्हायरल व्हिडिओवर म्हणाली, "आयब्रो आणखी वर हवे होते..."
19
IPL 2025: CSKच्या फॅन्सची चिंता वाढली! ऋतुराज पाठोपाठ MS धोनीलाही दुखापत? Viral Video मुळे चर्चा
20
NATO चा हल्ला झाला, तर सर्वात पहिले 'खाक' होणार 'हे' देश, रशियाची खुली धमकी!

अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 08:25 IST

व्यवस्थापकीय संचालकांचा निर्णय; अध्यक्षांकडून नाराजी .

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आले आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी हा निर्णय घेतला असून, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनानंतर शासनाने सगेसोयरे व इतर मागण्यांसाठी मुदत मागून घेतली आहे. राज्यभर मराठा आरक्षणाची चर्चा सुरू झालेली असतानाच अचानक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे सरकार मराठा समाजाला न्याय देण्याचे अश्वासन देत आहे, तर दुसरीकडे महामंडळातील मनुष्यबळ कमी केले जात आहे.  महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत ९० हजार तरुणांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. आता कर्मचारी कपातीमुळे कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे समाजबांधवांचे म्हणणे आहे.

नरेंद्र पाटील यांनीही महाव्यवस्थापकांच्या निर्णयास तीव्र विरोध केला आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक हा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाचे नुकसान करण्याचे षड्यंत्र कोणाचे हे तपासले पाहिजे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली असून, सोमवारी नवी मुंबईत दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन याबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

काय होणार परिणाम? - राज्यातील जवळपास ९० हजार तरुणांना महामंडळाच्या योजनेतून विविध बँकांनी कर्ज दिले आहे. कर्जावरील व्याज परतावा देण्याचे काम आता रखडणार आहे.- हजारो लाभार्थ्यांना ५० कोटी रूपये व्याज परतावा देणे आचारसंहितेमुळे रखडले आहे. त्या कामास अजून विलंब होईल. - राज्यातील ज्या बँकांकडून  वेळेत कर्ज उपलब्ध करून दिले  जात नाही. काही अडचणी  असतील, त्या बँकेशी  समन्वय ठेवून कर्मचारी त्या सोडवतात. ही समन्वयाची कामेही रखडण्याची चिन्हे आहेत. - व्याज परतावा देताना सर्व कागपत्रांची छाननी करावी लागते. ती कामेही रखडणार आहेत.

टॅग्स :Annasaheb Patil Mahamandalअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ