अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील ६१ कर्मचारी तडकाफडकी कामावरून काढले 

By नामदेव मोरे | Published: June 16, 2024 09:57 PM2024-06-16T21:57:37+5:302024-06-16T21:57:47+5:30

व्यवस्थापकीय संचालकांचा निर्णय; महामंडळाच्या अध्यक्षांनी व्यक्त केली नाराजी 

61 employees of the Annasaheb Patil Economic Development Corporation were dismissed in haste  | अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील ६१ कर्मचारी तडकाफडकी कामावरून काढले 

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील ६१ कर्मचारी तडकाफडकी कामावरून काढले 

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी मुंबई: मराठी तरूणांच्या हितासाठी निर्माण झालेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील ६१ कर्मचा-यांना तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आले आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी हा निर्णय घेतला असून महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 राज्यात मराठा आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मराठा समाजाच्या नाराजीचा फटका सत्ताधारी महायुतीला बसला आहे. आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनानंतर शासनाने सगेसोयरे व इतर मागण्यांसाठी मुदत मागून घेतली आहे. राज्यभर मराठा आरक्षणाची चर्चा सुरू झालेली असतानाच अचानक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातील ६१ कर्मचा-यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. या निर्णयामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकिकडे सरकार मराठा समाजाला न्याय देण्याचे अश्वासन देत आहे. दुसरीकडे महामंडळातील मनुष्यबळ कमी केले जात आहे.  महामंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत ९० हजार तरूणांना व्यवसायाठी कर्ज उपलब्ध करून दिले आहे. आता कर्मचारी कपातीमुळे कामकाजावर गंभीर होणार आहे.

महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनीही महाव्यवस्थापकाच्या निर्णयास तीव्र विरोध केला आहे. कोणतीही पुर्वकल्पना न देता अचानक हा निर्णय घेण्यात आला. मराठा समाजाचे नुकसान करण्याचे षडयंत्र कोणाचे हे तपासले पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली असून सोमवारी नवी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन भुमीका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. दुपारी १२ वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.
 

Web Title: 61 employees of the Annasaheb Patil Economic Development Corporation were dismissed in haste 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी