पनवेलमधून ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात

By admin | Published: February 14, 2017 04:35 AM2017-02-14T04:35:13+5:302017-02-14T04:35:13+5:30

पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी २३ व पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

62 candidates from Panvel are in the fray | पनवेलमधून ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात

पनवेलमधून ६२ उमेदवार निवडणूक रिंगणात

Next

पनवेल : पनवेल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी २३ व पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या ४२ पैकी १९ जणांनी व पंचायत समितीच्या ८० पैकी ४१ जणांनी अर्ज मागे घेतले.
जिल्हा परिषदेच्या केळवणे व वडघर येथे भाजपाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तेथे शेकापक्ष व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे. भाजपाच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपा - सेना पनवेलमध्ये युती झाल्याची चर्चा सुरू झाली. वावंजे व नेरे येथे तिरंगी लढत सेना, भाजपा व शेकापक्षात होणार आहे. पाली-देवदमध्ये चौरंगी लढत होणार असून भाजपा,शेकापक्ष, बहुजन समाज पार्टी व भारिप बहुजन समाज पार्टी या उमेदवारांमध्ये लढत होईल. गव्हाणमध्ये सेना, भाजपा, शेकापक्ष व दोन अपक्ष अशी लढत होणार आहे.
पंचायत समितीसाठी १६ जागांसाठी भाजपा १४, शिवसेना ८, शेकापक्ष ११, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ४ व अपक्ष २ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. चिंध्रण, नेरे, पाली देवद, पळस्पे, कोन, पोयंजे, करंजाडे, वडघर, केळवण व आपटा या १० ठिकाणी दुरंगी लढत होणार आहे तर वावंजे, आदई, विचुंबे, गुळसुंदे व वहाळ या ५ ठिकाणी तिरंगी लढत व गव्हाणला चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पोयंजे, करंजाडे या दोन ठिकाणी भाजपाने माघार घेतली आहे तर शेकापक्षाने ४ जागा आघाडीसाठी सोडल्या आहेत.

Web Title: 62 candidates from Panvel are in the fray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.