विजेचा शॉक लागून ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तुर्भे इंदिरा नगरमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 06:13 PM2020-07-17T18:13:07+5:302020-07-17T18:18:24+5:30
याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
नवी मुंबई - विजेचा शॉक लागून सात वर्षीय मुलाच्या मृत्यूची घटना तुर्भे इंदिरानगर येथे घडली आहे. उघड्यावर लटकणाऱ्या विद्युत वायरीमुळे लोखंडी शिडीच्या विद्युत प्रवाह उतरल्याने हि घटना घडली. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
तन्मय चव्हाण (७) असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी तो घरासमोर खेळत होता. यावेळी समोरच्या घराच्या लोखंडी शिडीला त्याचा स्पर्श झाला असता, शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. सदर घराला वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत वायरी शिडीपासून काही अंतरावरच लटकलेल्या आहेत. पावसाच्या पाण्यामुळे या वायरींमधून लोखंडी शिडीत विद्युत प्रवाह उतरल्याने ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच तुर्भे एमआयडीसी पोलीस व महावितरच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसठाण्यात घटनेची नोंद देखील करण्यात आली आहे. त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मयत तन्मयच्या कुटुंबीयांनी केली आहे. तर इंदिरानगर परिसरात प्रतिवर्षी पावसाळ्यात अशा घटना घडत असून त्यामध्ये अनेकजण मृत पावत असल्याचा संताप सामाजिक कार्यकर्ते महेश कोठीवाले यांनी केला आहे. मात्र, परिसरात उघड्यावर लटकणाऱ्या विद्युत वायरी सुरक्षित करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान शुक्रवारी घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल
गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा
अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार
...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'
मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला
पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये २५ वर्षीय तरुणीचं लैंगिक शौषण, विकृत प्रकार आला समोर